अजय देवगण स्टारर ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’च्या दिग्दर्शिका अश्विनी धीर यांचा १८ वर्षीय मुलगा जलज धीर याचा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत एका कार अपघातात मृत्यू झाला. विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर त्यांची कार दुभाजकाला धडकली तेव्हा तो त्याच्या तीन मित्रांसह कारमध्ये होता. जलजचा मित्र साहिल मेंढा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. ज्यामुळे ही दु:खद घटना घडली. (Ashwini Dhir 18 year Old Son Jalaj Dhir Dies)
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, जलज आपल्या काही मित्रांबरोबर रात्री उशिरा वांद्रे ते गोरेगावला निघाले होते. त्यापैकी एक, १८ वर्षीय साहिल मेंढा कार चालवत होता आणि तो दारूच्या नशेत होता. सहारा स्टार हॉटेलजवळ मेंढा यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट सर्व्हिस रोड आणि उत्तरेकडील पुलाच्या दरम्यान असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जलज आणि त्याचा दुसरा मित्र सार्थ कौशिक यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलज त्याच्या मित्रांसह घरी उपस्थित होता. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तो आपल्या तीन मित्रांसोबत व्हिडिओ गेम खेळत होता. यानंतर सर्व मित्रांनी अचानक ड्राईव्हला जाण्याचा बेत आखला. त्यांनी जलज यांच्या घरातून गाडी घेतली आणि आधी मुंबईतील वांद्रे भागात जेवणासाठी थांबले. यानंतर पहाटे ४.१० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत असताना साहिलचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”
दरम्यान, मुलाच्या निधनामुळे सध्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी धीर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांचे लेखन आणि निर्मितीही केली आहे. त्यांनी ‘वन टू थ्री’, ‘अति तुम कब जाओगे?’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि निर्मिती केली आहे.