शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शो सोडण्याचा विचार…”, ‘तारक मेहता…’च्या अब्दुने मालिका सोडण्यावरुन पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “माझं पात्र…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 23, 2024 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sharad Sankla statement

'तारक मेहता...'मधील अब्दुने मालिका सोडण्यावरुन पहिल्यांदाच केलं भाष्य

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या शोने जगभरातील प्रेक्षकांना वेड केलं आहे. या शोमधील प्प्र्त्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत सोडण्यापर्यंत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी अब्दुलच्या जाण्याच्या अटकळींनाही जोर आला. पण ते खरंच या शोमधून जात आहेत की नाही यामागचं सत्य अभिनेता शरद सांकला यांनी सांगितलं आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अब्दुलची भूमिका अभिनेता शरद सांकला साकारत आहे. नुकताच तो शो सोडत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आता ते या शोमध्ये दिसणार नाहीत अशा चर्चा पाहायला मिळाल्या. पण ‘इटाईम्स’शी विशेष संवाद साधताना अभिनेत्याने या अफवांचे खंडन केले. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sharad Sankla statement)

शो सोडण्याचा आपला कोणताही विचार नसल्याची ग्वाहीही त्याने दिली. एवढेच नाही तर शो प्रसारित होईपर्यंत तो TMKOC सोबतच राहणार असल्याचेही त्याने सांगितले.शोमधून बाहेर पडण्याच्या अफवांबाबत शरद सांकला म्हणाले की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. तो या शोच्या कथेचा एक भाग आहे आणि लवकरच गोकुळधाम सोसायटीत परतणार आहे यावर त्याने भर दिला. अफवांबद्दल बोलताना ते म्हणाले, “नाही, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी कुठेही जात नाही. मी या शोचा एक भाग आहे. शोचे कथानक असे आहे की माझ्या पात्राकडे सध्या कोणतेही काम नाही. पण लवकरच अब्दु परत येईल. हा कथानकाचा भाग आहे”.

आणखी वाचा – “नराधमांना कधी शिक्षा मिळणार?”, बलात्कार प्रकरणांवर तेजश्री प्रधानचा सवाल, म्हणाली, “आता समाजात…”

शरद पुढे म्हणाला, “हा खूप सुंदर व दीर्घकाळ चालणारा शो आहे आणि मी अब्दुलच्या व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो. ही माझ्यासाठी मोठी ओळख आहे. मग मी हा शो का सोडू? मी शो सोडण्याचा विचारही करु शकत नाही. ‘नीला टेलिफिल्म्स’ हे प्रोडक्शन हाऊस माझ्यासाठी एका कुटुंबासारखे आहे आणि आमचे निर्माते असित कुमार मोदी हे माझे महाविद्यालयीन मित्र आहेत आणि मी शो सोडण्याचे कोणतेही कारण नाही. जोपर्यंत शो चालू आहे. तोपर्यंत मी त्याचा एक भाग राहीन”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी बोटं तोंडात घाल”, इरिनावर निक्कीने राग काढताच वैभव भडकला, भांडणात लाथेने भांडी उडवली अन्…

शरद सांकला शो सोडल्याची अफवा पसरली होती कारण ते बरेच दिवस दिसले नव्हते. वास्तविक, गोकुळधाम सोसायटीतील लोक अब्दुल या व्यक्तिरेखेचा वाढदिवस विसरतात, ज्यामुळे तो दुःखी होतो. आणि त्यानंतर तो गायब होतो. त्यामुळे तेथील नागरिक चिंतेत असतात.

Tags: Sharad Sankla statementTaarak Mehta Ka Ooltah ChashmahTaarak Mehta Ka Ooltah Chashmah Sharad Sankla statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
neil nitin mukesh on kolkata rape case

"सहा वर्षांची माझी लेक आता…", सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता बलात्कार प्रकरणामुळे घाबरला, म्हणाला, "तिच्या भविष्याबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.