Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या पहिल्या आठवड्यातच घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते. अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी एकीकडे सुरू झाली तर, आणखी दोन स्पर्धकांमध्ये खास नातं पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव व इरीना. वैभवने इरिनाचं वारंवार कौतुक केल्याचे आणि तिला जास्त महत्त्व दिल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र राहिल्यामुळे अनेकदा जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच या नवीन पर्वात वैभव-इरीना यांच्यातील नात्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस’च्या घरात एकीकडे निक्की-अभिजीत यांची मैत्री अरबाजला खटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वैभव-इरीना यांच्यातील मैत्रीही आता काहींना सहन होत नाही असं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातली वैभव-इरीना यांची मैत्री निक्कीला सहन होत नाहीये असं दिसून येत आहे. याबद्दल ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच एक नवीन प्रोमो आला आहे, ज्यातून वैभव-इरीना यांच्यातील मैत्री निक्कीला पटत नसल्यामुळे वैभव व इरीना यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये वैभव-इरीना यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन या भांडणात निक्की लाथेने डिशही उडवताना दिसत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये निक्की इरीना विषयी अस म्हणते की, “बरं झालं ती नॉमिनेट झाली आहे. आता तर ती नॉमिनेटही झाली पाहिजे”. यावर वैभव “निक्की अति होतंय” असं म्हणतो. यावर निक्कीही “ती आधीपासून माझ्या टीममध्ये नव्हती. ती नंतर आली आहे”. यावर वैभव रागाने “असं फालतू काही ऐकून घेणार नाही”. असं म्हणतो. यावर निक्की “मी तुला नाही इरीना बोलली आहे” असं म्हणते. यावर वैभव इरीनाची बाजू घेत “तिला पण बोलायचं नाही. तुझ्या हाताला बोटं आहेत ती तोंडात घाल” असं म्हणत आहे. यानंतर निक्कीही “मी तुला या घरात माझा ‘पीए’ (सहाय्यक) म्हणून घेऊन आलेली नाही” असं म्हणते.
दरम्यान, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठीच्या थेट प्रक्रियेत इरीना, अभिजीत, आर्या व वैभव हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अशातच आता येतया आठवड्यात इरीना घराबाहेर जावी अशी इच्छा निक्कीने व्यक्त केल्यामुळे वैभवचा पारा चढला असून त्याच्यात व निक्कीमध्ये राडा झाला आहे. यामुळे ‘टीम ए’मध्ये फुट पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यातील हे वाद आता आणखी किती टोकाला जाणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.