शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दयाबेन परतणार नाहीच! ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांचे सगळेच प्रयत्न फसले, असित मोदी म्हणाले, “जवळचं नातं तरीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 3, 2025 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben

दयाबेन परतणार नाहीच! 'तारक मेहता…'च्या निर्मात्यांचे सगळेच प्रयत्न फसले,

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben  : मालिकाविश्वातील नेहमीच चर्चेत असणारी आणि लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. २००८ पासून ही मालिका अविरतपणे सुरु असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे आणि मालिकेने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. हा शो अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असला तरी लोकांना त्यातील हृदयस्पर्शी पात्रे आवडतात. यापैकी ‘दयाबेन’ हे सर्वात लोकप्रिय नाव आहे, ज्याची भूमिका शोच्या सुरुवातीपासून दिशा वाकाणीने साकारली होती. तथापि, अभिनेत्रीने २०१८ मध्येच शो सोडला आणि ती पुन्हा काही या शोमध्ये परतली नाही. दिशा वकानीला ‘दयाबेन’च्या भूमिकेत परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे निर्मात्यांनी अनेकदा सांगितले. पण अलीकडील अपडेटमध्ये, त्यांनी निराशाजनक बातमी शेअर केली की, अभिनेत्री शोमध्ये परतणार नाही.

असित मोदी यांनी नुकतेच News18 शी बोलताना ‘दयाबेन’बद्दल सांगितले. ते म्हणाले की, “ती या शोचा अविभाज्य भाग आहे आणि तिला परत आणायचे आहे. परंतु बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडून विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले”. असित म्हणाले, “दयाबेनला परत आणणं खूप गरजेचं आहे कारण मलाही तिची आठवण येते. कधीकधी परिस्थिती अशी बदलते की काही गोष्टी घडतात आणि उशीर होतो. कधी कधी कथा लांबते. कधी कधी काही मोठ्या घटना घडतात. २०२४ मध्ये निवडणुका होत्या, आयपीएल होते आणि त्यानंतर वर्ल्ड कपचे सामने होते, पावसाळ्यात काही कारणांमुळे उशीर होतो”.

आणखी वाचा – “लग्नापूर्वीच त्याला ओळखलं असतं तर…”, शालिन भानोतबरोबरच्या तुटलेल्या लग्नाबद्दल दलजीत कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, “घटस्फोटानंतरही…”

त्याच मुलाखतीत, असित मोदीने दिशा वाकाणीच्या शोमध्ये परत येण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा केली आणि पुष्टी केली की ती सध्या तसे करु शकणार नाही. असित म्हणाले, “मी अजूनही प्रयत्न करतोय. मला विश्वास आहे की दिशा वाकानी परत येऊ शकत नाही. त्यांना दोन मुले आहेत. ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही त्यांच्या कुटुंबाशी आमचे खूप जवळचे नाते आहे. माझी बहीण दिशा वकानी हिने मला राखी बांधली आहे. तिचे वडील आणि भाऊही माझ्यासाठी एक कुटुंब आहे. आम्ही १७ वर्षे एकत्र काम केले आहे”.

आणखी वाचा – निर्मात्यांनी गोविंदाची फसवणूक करत पैसे दिले नाहीत अन्…; पत्नी सुनीता अहुजाचा खुलासा, म्हणाल्या, “मी माझा हक्क…”

ते शेवटी म्हणाले, “तिच्यासाठी आता शोमध्ये परतणे कठीण आहे. लग्नानंतर महिलांचे आयुष्य बदलते. लहान मुलांसह काम करुन घर सांभाळणे त्यांच्यासाठी थोडे कठीण आहे. पण तरीही मी सकारात्मक आहे. कुठेतरी देव काहीतरी चमत्कार करेल आणि ती परत आली तर चांगली गोष्ट होईल असं वाटतं. काही कारणास्तव ती आली नाही तर शोसाठी मला दुसरी दयाबेन आणावी लागेल”.

Tags: Taarak Mehta Ka Ooltah ChashmahTaarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayabentelevision news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
marathi actress hemal ingle entered the wedding hall and she got emotional after seeing her husband video viral on social media.

Video : लग्न मंडपात एन्ट्री करताना मराठी अभिनेत्रीला रडू आवरेना, नवऱ्याला बघितलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.