गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु होती आणि ही मराठी अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामधून हेमल प्रेक्षकांच्या भेटीला आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हेमलने बॉयफ्रेंड रौनकबरोबर लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेमल आणि रौनक एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. यानंतर अभिनेत्रीचं केळवण, मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडला होता. लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर २ जानेवारी रोजी हे जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. (hemal ingle emotional)
हेमलने लग्नात गुलाबी रंगाचा छान, सुंदर असा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. या शिवाय या भरजरी लेहेंग्यावर मोकळे केस, गळ्यात नेकलेस आणि हातात चुडा असा सुंदर लूक केला होता. तर हेमलचा नवरा रौनक चोरडियाने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोघे या खास लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. हेमल-रौनक यांचा विवाहसोहळा अगदी शाही पध्दतीने पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल होत झालेल्या फोटो व व्हिडीमधून हे दोघे समुद्रकिनारी एका शांत ठिकाणी विवाहबंधनात अडकल्याचे दिसून येत आहे.
हेमल इंगळे आपल्या लग्नात भावुक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘आफ्रीन’ गाण्यावर लग्नमंडपात एन्ट्री घेते आणि या एन्ट्रीनंतर ती नवरा रौनकला पाहताच भावुक होते. त्याच्यासाठी ‘आफ्रीन’ गाण्यातील काही ओळी गात ती चार पाऊले पुढे चालत जाते. त्यानंतर रौनक तिला मिठीत घेत धीर देण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर हेमल-रौनकचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, नुकतीच सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याआधी ती सचिन पिळगावकरांच्याच ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाततेही दिसली होती. अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकल्यामुळे आता अनेक चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.