मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’च्या टप्पूने लोकप्रियता, पैसा मिळत असूनही मालिका का सोडली?, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “खूप चढ-उतार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 19, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raj anadkat on big boss

'तारक मेहता…'च्या टप्पूने लोकप्रियता, पैसा मिळत असूनही मालिका का सोडली?, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, "खूप चढ-उतार…"

 ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या १६ वर्षामध्ये या मालिकेमधून अनेक कलाकार बाहेरदेखील पडले आहेत. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकट याने मालिका सोडली असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून  आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. तो आपल्या चाहत्यांना हा शो का सोडला? तसेच टप्पू ही भूमिका काशी मिळाली याबद्दल देखील त्याने सांगितले आहे. (Raj anadkat on big boss)

‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये राजने टप्पूची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर त्याने या शोला राम राम केला. आता त्याने ‘बिग बॉस’ची ऑफर मिळाल्याचेदेखील सांगितले होते. याबद्दल त्याने आता खुलासा केला आहे. राजने सांगितले की, “एक अभिनेत्याच्या रुपात तुम्ही त्याना यादीमध्ये जोडू शकत नाही. ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करु इच्छिता. मला आतापर्यंत सलमान खान , शाहरुख खान व रणवीर सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा आम्ही केबीसीच्या सेटवर गेलो तेव्हा मला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली”.

आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

पुढे तो म्हणाला की, “मी जेव्हा अमितजी यांना प्रश्न विचारत होतो तेव्हा मी खूप घाबरलो होतो. पण काही कारणांनामुळे मात्र हा एपिसोड येऊ शकणार नाही. पुन्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी हीच मी प्रार्थना करत आहे”.

आणखी वाचा – सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

तसेच पुढे त्याने सांगितले की, “मला दोन वेळा ‘बिग बॉस’ची ऑफर मिळाली होती. मला जर पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच या शोमध्ये जाईन. हा शो मी सुरुवातीपासून बघत आलो आहे. मला २०२२ व २०२३ मध्ये ऑफर आली होती. पण काही कारणांमुळे मी यामध्ये सहभागी होऊ शकलो नाही. पण जर आता ऑफर आली तर मी नक्की करेन”.

त्यानंतर ‘तारक मेहता…’ मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तो म्हणाला की, “या मालिकेमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी या शोमधून खूप काही शिकलो आहे. तसेच मी खूप चढ उतार पाहिले आहेत. माझ्याकडे या मालिकेच्या खूप आठवणी आहेत. सिंगापूरच्या निमिताने मी पाहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्रीप केली. ही मालिका केल्याचा मला खूप आनंद होत आहे”.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’ वेबसीरिजला भरघोस प्रतिसाद, उद्या साताऱ्यात होणार खास सेलिब्रेशन, प्रेक्षकांना कलाकारांना भेटण्याची सुवर्ण संधी

तसेच मालिका सोडण्याबद्दल तो म्हणाला की, “मी पाच वर्ष या मालिकेमध्ये काम केले. हा प्रवास खूप सुंदर होता पण मला इतर भूमिका करायच्या होत्या. मला माझ्या करिअरमध्ये प्रगती करायची होती त्यामुळे मी ही मालिका सोडली. तसकह प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेमही दिले”.

दरम्यान सध्या राज कोणत्याही कार्यक्रमामध्ये काम करत नाही आहे. पण लवकरच तो एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसू शकतो.

Tags: raj anadkattaarak Mehta ka oolta chashmatappu
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Madhurani Prabhulkar On Shooting

"औषध घेऊन काम करायचे आणि…", आशुतोषच्या मृत्यूच्या सीन शूटदरम्यान मधुराणी प्रभुलकरला झाला होता 'हा' आजार, म्हणाली, "झोपल्यानंतर मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.