सध्या स्टँडअप कॉमेडीमुळे अनेक चेहरे खूप प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यातील काही कलाकारांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली. त्यातील एक आघाडीची कलाकार म्हणजे कुशा कपिला. कुशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ६ वर्ष संसार केल्यानंतर पती जोरावर अहलुवालियाबरोबर घटस्फोट घेतला. याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. (kusha kapila love rumors)
तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरबरोबर जोडले गेले होते. त्यानंतर लगेचच कुशाने याबद्दल खुलासा करत असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा तिच्या डेटिंगबद्दलची अनेक वृत्त ऐकायला मिळत आहेत. ती आता प्रसिद्ध कोमेडियन व अभिनेता अनुभव सिंह बस्सीला डेट करत आहे. दोघांबद्दलची एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने दोघांच्या नात्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुशा व अनुभव हे दोघंही गोव्यामध्ये एकत्र फिरायला गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. हे पाहून दोघांचेही चाहते खूप हैराण झाले होते. पण अद्याप कुशा व अनुभव यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
अनुभवच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने त्याच्या करियरची सुरुवात एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली होती. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ हीट झाले होते. त्याच्या सगळ्या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. त्याचे कॉमेडीचे अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. तो अभिनेता रणबीर कपूरबरोबर ‘तु झुटी मै मक्कार’ या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आला होता.
तसेच कुशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने भूमी पेडणेकरबरोबर ‘ थॅंक यू फॉर कमिंग’ व शिल्पा शेट्टीबरोबर ‘सुखी’ या चित्रपटात दिसली होती.