‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल यांच्या ‘आठवी अ’ या सीरिजने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आहे.
आपण ‘आठवी अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सीरिजमधून देण्यात आली आहे. ‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे.
या सीरिजचे आतापर्यंत १४ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या एका भागाला तब्बल १४ लाख व्ह्यूज्स मिळाले आहेत. तर काही भागांनी लाखों व्ह्यूज्सचा टप्पा पर केला आहे. त्यामुळे ‘आठवी-अ’ला मिळत असलेल्या या भरघोस प्रतिसादासाठी उद्या सातारा येथे सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली आहे.
उद्या म्हणजेच शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी, सायंकाळी ६ वाजता हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. साताऱ्यामधील शाहू कलामंदिर इथे हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमात सीरिजमधील कलाकारांची धमाल, मजामस्ती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना ‘आठवी-अ’च्या कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी या खास कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असणार आहे.
दरम्यान, ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह-दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे या सीरिजचे प्रोजेक्ट प्रमुख आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे.