सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neena Gupta's daughter Masaba is pregnant she given this information through a special post on social media.

नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, "मुलांचे मूल..."

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या लवकरच आजी होणार आहेत. त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मसाबा गुप्ता गरोदर असून लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर एका खास पोस्टदावरे शेअर केली आहे.  

मसाबाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे पहिल्या पोस्टमध्ये एका गर्भवती महिलेचा इमोजी शेअर केला आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये एका महिलेचा व पुरुषाचा डोळ्यात आनंद असलेला इमोजी पोस्ट केला आहे आणि या पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये मसाबा व तिचा पती सत्यदीप मिश्रा दिसत आहेत. या फोटोमध्ये पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून ती बसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “दोन छोटे पाय आमच्या दिशेने येत आहेत! कृपया प्रेम, आशीर्वाद आणि केळीचे चिप्स (फक्त मीठ असलेल्या) पाठवा” असं म्हटलं आहे. या पोस्टखाली अनेकांनी तिला शुभेच्छा देत तिने अभिनंदन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Masaba ???? (@masabagupta)

आणखी वाचा – “आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून…”, राजकारणातील प्रवेशाबाबत मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले, म्हणाले, “आता म्हातारपणात…”

एकीकडे मसाबाने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे, तर दुसरीकडे नीना गुप्ता  यांनीही आजी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. नीना गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर मसाबा व सत्यदीपचा फोटो शेअर करत “आमच्या मुलांचे मूल येणार आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात, गंभीर दुखापतीनंतर सर्जरीही होणार, नेमकं काय घडलं?

दरम्यान, मसाबाने २०१५ मध्ये निर्माता मधु मंतेनाशी लग्न केलं, पण २०१८ मध्ये हे नातं तुटलं. दोघे वेगळे झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. गेल्या वर्षी, २७ जानेवारी २०२३ रोजी मसाबाने सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं, जो एक अभिनेता आहे. तो आदिती राव हैदरी हिचा माजी पती आहे. २०१३ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. दुसरीकडे, मसाबासोबतचे लग्न संपल्यानंतर मधुनेही गेल्या वर्षी ११ जून रोजी योग शिक्षिका इरा त्रिवेदीबरोबर लग्न केलं.
 

Tags: Bollywood entertainment newsmasaba guptaMasaba Gupta Pregnantneena gupta daughter
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
kaustubh diwan marriage

शुभमंगल सावधान! 'जुळून येती रेशीमगाठ' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, मराठी कलाकारांची गर्दी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.