टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमधील सर्वच पात्रांच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. काही महिन्यांपूर्वी या मालिकेधील ‘मि. सोढी यांची भूमिका सकारणारे गुरुचरण सिंह हे अधिक चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी ते जवळपास २५ दिवस गायब होते. ते गायब झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. गुरुचरणच्या वडिलांनी तो परत आल्याचे बातमी पोलिसांना दिली होती.मात्र अनेक दिवस ते मीडियाच्या समोर आले नव्हते. अशातच आता त्यांनी त्यांच्या गायब होण्याचे सत्य सांगितले आहे. (gurucharan singh on spiritual journey)
गुरुचरण जेव्हा गायब झाले तेव्हा त्यांच्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले होते. कर्जबाजारी, आर्थिक संकट यामुळे यावेळी त्यांच्या अनेक इमेल आयडीबद्दलही माहिती मिळाली होती. मात्र त्यांनी स्वतः आध्यात्मिक यात्रेसाठी गेले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की, “मी कर्जबाजारी झालो होतो किंवा कर्ज फेडू शकत नव्हतो यासाठी मी गायब झालो नव्हतो. आजही माझ्यावर कर्ज आहे. माझी नियत चांगली आहे आणि पैसे उधार घेऊन मी आजही ही कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी गेले चार वर्ष कामाच्या शोधात आहे आणि मला सगळीकडून नकारच मिळत आहे. मी आध्यात्मिक यात्रेला जाऊन आल्यापासून माझ्यामध्ये माणूस म्हणून खूप बदल झाला आहे. २५ दिवसांमध्ये मी संपूर्ण जग पाहिलं आहे. मी हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं नव्हतं. पैशाबद्दल बोलायचे झाले तर मी अनेक निर्णय घेतले आहेत. मी लोकांना सांगेन की पैसे उधार घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त कर्जच घेत राहाल”.
आणखी वाचा – भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?
नंतर त्यांनी सांगितलं की, “जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला ५० हजार रुपये द्यायचो. तसेच घरातील आचाऱ्याचीही आर्थिक मदत केली आहे”.जेव्हा त्यांना गायब होण्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, “मी माझ्या जवळच्या माणसांमुळेच खूप दु:खी होतो. अशी एखादी वेळ येते जेव्हा तुम्हाला कुटुंब व जगापासून दूर जावे लागते. काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण माझ्या जवळच्या माणसांनी मला खूप दु:ख दिले. मात्र काहीही झाले तरीही मी आत्महत्येचा विचार केला नाही”. दरम्यान गुरुचरण यांच्या या वक्तव्यामुळे ते अधिक चर्चेत आले आहेत.