रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोबरोबर घटस्फोट जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याचा अनन्या पांडेबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “प्रेमकहाणी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 22, 2024 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ananya pandey and hardik pandya

बायकोबरोबर घटस्फोट जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याचा अनन्या पांडेबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “प्रेमकहाणी...”

 काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळे होणार असल्याचे जाहीर केले होते. लग्न झाल्यानंतर चार वर्षातच दोघांनी वेगळं होणार असल्याचा निर्णय घेतला. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर लगेचच हार्दिकचा एका मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या मुलीबरोबर त्याच्या अफेअरच्या चर्चादेखील अधिक झाली. आता पुन्हा एकदा हार्दिक एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. (ananya pandey and hardik pandya)

काही दिवसांपूर्वी अनंत व राधिका यांचे लग्न मुंबई येथे पार पडले. या शाही लग्न सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सगळे कलकार उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या लग्नसोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. अनन्याने राधिका व अनंत यांच्या लग्नात खूप धमाल केलेली दिसून आली. याचवेळी अनन्या व हार्दिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे हार्दिकचा घटस्फोट झाल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. आता दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.

आणखी वाचा – “नारकरांचे अचरट हावभाव आणि…”, नवऱ्याच्या डान्सवरुन बोलणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या, “लाज वाटायला हवी की…”

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

मुकेश व नीता यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिकाच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. समोर आलेल्या काही व्हिडीओमध्ये नताशा व हार्दिक यांचा धमाल डान्सही पहायला मिळत आहेत. दोघेही एकत्र येऊन धमाल करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हार्दिक, अनन्या, रणवीर सिंहबरोबर ‘सिंबा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ या गाण्यावर नाचत आहेत. यावेळी हार्दिक व नताशा यांच्यामध्ये केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “हळदी कुंकूचा लग्नाशी संबंध नाही”, सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “नवरा नसलेल्या…”

अनन्या व हार्दिक यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, अनन्या हार्दिकला इम्प्रेस करण्यासाठी चांगला डान्स करत आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “असं वाटत आहे की हे सगळे जबरदस्तीने नाचत आहेत”, तसेच अजून एकाने लिहिले की, “आमचा पांड्या भाऊ बॉलिवूडमध्ये एकटा फसला आहे”. त्यामुळे आता खरच आता हार्दिक व नताशामध्ये काही प्रेमकहाणी आहे का? यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.   

Tags: ananya padeyHardik Pandyastory
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Tv actress Deepika Kakkar shared a photo of husband Shoaib Ibrahim and said, he is busy with my sautan know more

दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.