सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन करत आहे रितेश देशमुख, होकार देण्यामागचं कारणही सांगितलं, म्हणाला, “एका शोचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 22, 2024 | 6:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh On Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करत आहे रितेश देशमुख, होकार देण्यामागचं कारणही सांगितलं, म्हणाला, "एका शोचा…"

सध्या ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’मराठीचा पाचवा सिझन लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. येत्या २८ जुलै रोजी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा सिझन सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या सिझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण या सिझनमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दोन महिन्यांपूर्वी खास प्रोमो शेअर करत या सिझनच्या होस्टसाठी रितेश देशमुखच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Riteish Deshmukh On Bigg Boss Marathi 5)

यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. मांजरेकरांच्या जागी आता रितेश सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर रितेश हिंदी बिग बॉसमध्येही शो होस्ट करताना दिसणार का?, मात्र आता रितेश मराठी ‘बिग बॉस’मध्ये सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेशची दमदार एण्ट्री पाहायला मिळाली. नुकतीच ‘बिग बॉस सिझन ५’ची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना रितेशने या शोसाठी का होकार दिला याबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – बायकोबरोबर घटस्फोट जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याचा अनन्या पांडेबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “प्रेमकहाणी…”

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

या शोसाठी होकार देण्याचे कारण सांगत रितेश म्हणाला, “दोन तीन शूट माझे होते पण मी ते शूट मी शिफ्ट करत या चित्रीकरणाला होकार दिला. मी या चित्रीकरणासाठी खूप उत्सुक आहे. या शोला होकार देण्याचं कारण म्हणजे जो एका शोचा फॅन असतो त्यात सहभागी व्हायची आपल्याला संधी मिळाली तर यासाठी कोण नकार देणार?, म्हणून मी होकार दिला. आणि ‘बिग बॉस या रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणं हे मिळालेल्या संधीपेक्षा खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढीचा मोठा खुलासा, अखेर २५ दिवस गायब असण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाले, “माझ्या जवळच्या…”

आजवर रितेशने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही रितेश बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सध्या रितेश ‘बिग बॉस’मराठी सिझन ५च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Tags: bigg boss marathi season 5entertainmentmarathi reality showriteish deshmukhRiteish Deshmukh On Bigg Boss Marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Riteish Deshmukh talk about Genelia's reaction when he agreed to host Bigg Boss Marathi show

‘बिग बॉस’ शो होस्ट करणार असल्याचे कळताच ‘अशी’ होती जिनिलियाची प्रतिक्रिया, रितेशनेच केला खुलासा, म्हणाला, “तिचं मत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.