रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 22, 2024 | 3:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial new twist Bhuvneshwari will be out of the house know more

भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन...’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गेल्या दीड वर्षांपासून शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. 

अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. त्यामुळे अधिपती तिला प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. त्याचं अक्षरावर मनापासून प्रेम असतं. सुरुवातीला या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षा देखील घेतली. परंतु, आता लवकरच मालिकेत एक नवीन वळण येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “लक्ष्या केवळ उत्तम कलाकारच नाही तर…”, अश्विनी भावेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची खास आठवण, म्हणाल्या, “सेटवर असला की…”

चारूहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढणार आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये चारूहास तिला धमकी देत आहेत. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये चारूहास भुवनेश्वरीला “माझं घर टिकलं नाही तरी चालेल. पण या घरात तुझं अस्तित्व नको आहे. तू या घराला लागलेला श्राप आहेस” असं म्हणतात. यावर भुवनेश्वरी “तुम्ही काय मग आता मला घराबाहेर काढणार का?” असं म्हणते. यावर चारूहासदेखील “गरज पडली तर तेही करेन” असं म्हणतात.

आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”

एकीकडे चारूहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढायचा विचार करत आहेत, तर दुसरीकडे अधिपती मात्र त्याला आईपासून लांब राहणे सहन होत नसल्याचे अक्षराला सांगतो. “आम्हाला आईसाहेबांना सोडून कुठेही जायचं म्हटलं तर परदेशातच आहोत असं वाटतं” असं म्हणतो. त्यामुळे आता मालिकेत भुवनेश्वरी खरंच घर सोडून जाणार का? की तिची ही नवीन खेळी असेल हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
ananya pandey and hardik pandya

बायकोबरोबर घटस्फोट जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याचा अनन्या पांडेबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “प्रेमकहाणी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.