बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या विविधांगी भूमिकांनी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. आपल्या आशयघन अभिनयाने तापसी नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तापसीचं लग्न. अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर मागच्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि अखेर हे दोघे आता विवाहबंधनात अडकणार आहेत..
तापसी येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. तापसीचे लग्न हा केवलेक कौटुंबिक विधी असून या लग्नाला ती कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला बोलावणार नसल्याचेही समोर आले आहे. यांचे नेमके कारण आद्यप समोर आले नाही. पण तापसीच्या लग्नात कोणत्याच कलाकाराला आमंत्रण दिले जाणार नाही. असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर तापसीने मौन सोडलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तापसीने असं म्हटलं की, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि भविष्यात कधीच देणार नाही.” तापसीने प्रतिक्रिया दिली असली तरी ती लग्न करणार की नाही याबाबत तिने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे अभिनेत्रीच्या लग्नाकी चर्चा या केवळ अफवाच आहेत की काय असा विचार अनेकांच्या मनात येत आहे.
दरम्यान, तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तसेच ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ मध्ये विक्रांत मॅसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिलसोबत दिसणार आहे. याशिवाय अर्शद सय्यद लिखित आणि दिग्दर्शित ‘वो लड़की है कहाँ’ या आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपटातही ती दिसणार आहे.