बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, लग्नानंतर पूजा सावंतसाठी नवऱ्याचा हटके स्टाईल उखाणा, उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 29, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Narathi News

पूजा सावंत सिद्धेश चव्हाण विवाह सोहळा

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : सिनेसृष्टीतील अखेर कलरफुल अशी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर आता पूजाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडलेला पाहायला मिळत आहे. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पूजाचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लगीनगाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या वाटेवर पाऊल टाकलं आहे. लग्नानंतर पूजा व सिद्धेश दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

नातेवाईक, कलाकार मंडळी, मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेशचा भव्य दिव्य असा विवाह सोहळा संपन्न झाला. अवाढव्य खर्च, महागडे कपडे, स्वादिष्ट भोजन या सर्वच गोष्टीत कोणतीच कमतरता न भासू देता पूजा व सिद्धेश अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर गेल्या महिन्यात पूजाने थेट साखरपुडा सोहळा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तेव्हापासून पूजाच्या लग्नाची साऱ्यांना चाहूल लागून राहिली होती.

आणखी वाचा – अखेर लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

अखेर आता पूजा सावंत लग्न बंधनात अडकली आहे. पूजाच्या लग्नापूर्वीच्या विधींचेही फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. तर लग्नातल्या रिसेप्शन लूकच्या फोटोंनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. भरजरी कपडे परिधान करत दोघांचा लूक खूपच सुंदर दिसत होता. पूजाने लग्नाच्या रिसेप्शनसाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर सिद्धेशने कुर्ता, पायजमा व त्यावर नक्षीदार अशी शॉल घेतली होती. लग्न लागल्यानंतर पूजासाठी तिच्या नवऱ्यानं म्हणजे सिद्धेशने घेतलेला उखाणा खूपच खास होता. बायकोसाठी उखाणा घेत सिद्धेश म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका, पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका!”. हा उखाणा ऐकताच साऱ्यांनी सिद्धेशच कौतुक केलं.

आणखी वाचा – “सोन्याच्या ताटात…”, पूजा सावंतचा नवऱ्यासाठी खास उखाणा, सिद्धेशचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ समोर

पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण सध्या भारतात राहत नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करत आहे. पूजाने “सिद्धेश कायमस्वरुपी ऑस्ट्रेलियात नाही. तो आताच दोन वर्षांपूर्वी गेला आहे. तो मूळचा मुंबईचा आहे. त्याचे आई-बाबा मुंबईत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईतचं राहणार आहोत. काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन”, असं एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं.

Tags: entertainmentPooja Sawant Siddhesh Chavan Marriage DatePooja Sawant Siddhesh Chavan WeddingPooja Sawant Siddhesh Chavan Wedding Marathi News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Pooja Sawant and Siddhesh Chavan's wedding look viral on social media

ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; रिसेप्शनसाठी पूजा सावंतने नेसली लाल रंगाची साडी, मंगळसूत्राने वेधलं लक्ष, पाहा खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.