बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत…”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Taapsee pannu reacted on wedding rumors with boyfriend mathias boe see the details

“माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत...”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही...”

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या विविधांगी भूमिकांनी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. आपल्या आशयघन अभिनयाने तापसी नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तापसीचं लग्न. अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर मागच्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि अखेर हे दोघे आता विवाहबंधनात अडकणार आहेत..

तापसी येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. तापसीचे लग्न हा केवलेक  कौटुंबिक विधी असून या लग्नाला ती कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला बोलावणार नसल्याचेही समोर आले आहे. यांचे नेमके कारण आद्यप समोर आले नाही. पण तापसीच्या लग्नात कोणत्याच कलाकाराला आमंत्रण दिले जाणार नाही. असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर तापसीने मौन सोडलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तापसीने असं म्हटलं की, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि भविष्यात कधीच देणार नाही.” तापसीने प्रतिक्रिया दिली असली तरी ती लग्न करणार की नाही याबाबत तिने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे अभिनेत्रीच्या लग्नाकी चर्चा या केवळ अफवाच आहेत की काय असा विचार अनेकांच्या मनात येत आहे.

आणखी वाचा – ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; रिसेप्शनसाठी पूजा सावंतने नेसली लाल रंगाची साडी, मंगळसूत्राने वेधलं लक्ष, पाहा खास फोटो

दरम्यान, तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आणखी वाचा – “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, लग्नानंतर पूजा सावंतसाठी नवऱ्याचा हटके स्टाईल उखाणा, उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव

तसेच ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ मध्ये विक्रांत मॅसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिलसोबत दिसणार आहे. याशिवाय अर्शद सय्यद लिखित आणि दिग्दर्शित ‘वो लड़की है कहाँ’ या आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपटातही ती दिसणार आहे.

Tags: bollywood actressbollywood newsentertainment newsmathias BobTaapsee PannuTaapsee Pannu Marriage Newsतापसी पन्नूबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमॅथियस बोब
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Yashraj Mukhate Wedding

‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटेचा विवाहसोहळा संपन्न, नोंदणी पद्धतीने केलं लग्न, सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.