Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने व हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहणारी पूजा सावंत गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. गेले काही दिवस अभिनेत्रीच्या घरी लग्नाची धामधूम चालू होती. नुकताच पूजाचा संगीत व हळदी समारंभ पार पडला. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकली आहे.
गेले काही दिवस पूजाच्या संगीत, हळदी तसेच लग्नाआधीच्या काही विधींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर झालेले पाहायला मिळाले. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. अशातच आता तिच्या लग्नाचे काही खास क्षणही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. अशातच तिचे शाही विवाहसोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.
आणखी वाचा – “सोन्याच्या ताटात…”, पूजा सावंतचा नवऱ्यासाठी खास उखाणा, सिद्धेशचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ समोर
काल २८ फेब्रुवारी रोजी पूजा-सिद्धेश ही जोडी विवाहबंधनात अडकली असून लग्नानंतर त्यांचा शाही रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पूजा-सिद्धेशच्या लूकने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पूजा-सिद्धेशने लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी लाल रंगाची साडी व त्यावर साजेसा असा साजशृंगार केला होता. तसेच हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा व कपाळाला कुंकू असा लूक केला होता. तर पूजाचा नवरा सिद्धेशने काळ्या रंगाचा पठाणी कुर्ता व त्यावर सुंदर नक्षीकाम असलेली शाल घेतली होती.
आणखी वाचा – अखेर लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
पूजा-सिद्धेशचा हा रिसेप्शन लूक विराट कोहली व अनुष्का शर्मा या लोकप्रिय जोडीच्या लग्नाच्या ड्रेसिंगसारखाच असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असलेले पाहायला मिळत आहे. पण तरीही अनेकांनी त्यांचा हा लूक आवडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेक चाहत्यांनी पूजाच्या लग्नानिमित्त तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.