हल्ली मनोरंजन सृष्टीमध्ये पापाराझीचे प्रस्त प्रचंड वाढलं आहे. सेलिब्रिटी कुठेही गेले की, त्यांच्यापाठोपाठ पापाराझी तिथे पोहोचतात. पापाराझी सेलिब्रिटींच्या मागेमागे करत त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकाराची प्रत्येक झलक टिपण्यासाठी अगदी उन्हातान्हात हे पापाराझी मेहनत घेत असतात. मात्र काही वेळेस पापाराझी सतत पाठलाग करत असल्याने सेलिब्रिटीसुद्धा अनेकदा वैतागतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू.
तापसी पापाराझींवर अनेकदा ओरडताना किंवा रागावताना दिसली आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच तापसीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्रीने केलेल्या कृतीमुळे अभिनेत्रीवर टीका केली जात आहे.
तापसीच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तापसी पन्नू तिची बहीण शगुनबरोबर येताना दिसत आहे. त्यांना पाहताच पापाराझी पोज देण्याची विनंती करतात. तसेच काही चाहतेदेखील तापसीबरोबर सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आहेत. या व्हिडीओमध्ये प्रत्येकजण तिला ‘मॅम मॅम…’ म्हणत त्यांचा फोटो क्लिक करण्याची विनंती करत आहे, परंतु तापसी कोणाचेही ऐकत नसल्याचे यामध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार
गर्दीतून बाहेर पडून तापसी तिच्या गाडीकडे जाऊ लागताच तिचे चाहते आणि पापाराझीदेखील कॅमेरा व मोबाईल घेऊन तापसीचा पाठलाग करू लागतात. मात्र पापाराझी खूपच जवळ येताना पाहून तापसी त्यांना बाजूला व्हा, बाजूला व्हा” असं म्हणत आहे. तसेच ती पापाराझीला “तुम्ही माझी खूपच जवळ येत आहात” असंही म्हणताना दिसून येत आहे.
दरम्यान. तापसीचे हे वागणे अनेकांना हटकले असून याबद्दल नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या व्हायरल व्हिडीओखाली एकाने लिहिले की, “मला समजत नाही की, तुम्हाला स्वयंघोषित सेलिब्रिटीबरोबर सेल्फी का काढायचा आहे” तर आणखी एकाने “ही काय माणूस आहे… चाहत्यांचा आदर करा, त्यांच्यामुळेच तुम्ही आहात”. तर अनेकांनी तिचे हे वागणे बघून ती खूप जास्त भाव खात असल्याचे म्हटले आहे.