रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar, Vijay Verma and Siddharth Jadhav will be seen in Nagraj Manjule's 'Matka King' series.

नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार

‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’सारख्या चित्रपटातून मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारे नागराज मंजुळे आता ओटीटी विश्वात एक रंजक सीरिज घेऊन येत आहेत. नागराज मंजुळेंची यांची पहिली वहिली वेब सीरिज ‘मटका किंग’ ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे.    

‘मटका किंग’ या शीर्षक भूमिकेत अभिनेता विजय वर्मा असणार हे ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडून याआधीच जाहीर करण्यात आले होते. अशातच आता विजयसह या सीरिजमध्ये इतर कोण कलाकार असतील हेही समोर आले आहे. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर या सीरिजचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. सई आणि नागराज पहिल्यांदाच या सीरिजसाठी एकत्र आले असून सईसह अभिनेता सिद्धार्थ जाधवही या सीरिजमध्ये असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

सई व सिद्धार्थ या कलाकारांसह क्रितिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, भुपेंद्र सिंह जडावत हे कलाकारही ‘मटका किंग’मध्ये दिसणार आहेत. ‘मटका किंग’ची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, आशिष आर्यन आणि अश्विनी सिधवानी यांनी रॉय कपूर फिल्म्स अंतर्गत केली आहे. तर नागराज आणि अभय कोरान्ने यांनी ‘मटका किंग’च्या लिखाणाची जबाबदारी निभावली.

आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार

वेगळ्या विषयाच्या धाटणीसाठी ओळखले जाणारे नागराज मंजुळे आता या सीरिजमधून प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार? हे पाहणे म्हणजे समस्त प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे. त्यामुळे या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्कीच. दरम्यान, या सीरिजच्या  प्रदर्शनाबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नसली तरी अनेकजण ‘मटका किंग’च्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Matka King Series Newsnagraj manjulesaie tamhankarsiddharth jadhavVijay Verma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha vaishampayan and prathamesh laghate nepal diaries

"डाएट वगैरे भारतात ठेऊन…", नेपाळमध्ये खाण्यात मग्न झाले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, फोटोही केले शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.