शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ८५ व्या वर्षी हेलन यांचा जिममध्ये वर्कआऊट, चाहत्यांकडून कौतुक, म्हणाल्या, “मला नशा करण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2024 | 7:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress helen workout

Video : ८५ व्या वर्षी हेलन यांचा जिममध्ये वर्कआऊट, चाहत्यांकडून कौतुक, म्हणाल्या, "मला नशा करण्यासाठी…"

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आजही मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या दिसून येतात. ७०-८० चा काळ गाजवलेली सुप्रसिद्ध हेलन ही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हेलन यांच्या मुळे हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड नृत्य पाहिल्यांदा हेलन यांनी सादर केले. कॅब्रे डान्सर अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. ‘ये मेरा दिल’, ‘पिया तू आब तो आजा’, ‘मेहबूबा मेहबूबा’ अशी अनेक गाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहेत. अभिनय व नृत्यकौशल्याने त्यांनी प्रेक्षकांची मनंदेखील जिंकून घेतली आहेत. (actress helen workout)

मनोरंजन क्षेत्रात असताना त्यांनी लेखक सलीम खानबरोबर लग्न केले. सलीम खान हे सलमान खानचे वडील असून त्यांचे हेलन यांच्याबरोबर दुसरे लग्न आहे. आतादेखील हेलन या सलीम यांच्याबरोबर राहतात. अशातच हेलन यांचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हेलन यांचे वय सध्या ८५ वर्ष आहे. या व्हिडीओमध्ये त्या जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. प्रसिद्ध जीम ट्रेनर यास्मीन कराचीवालाने हेलन यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा -Video : “आदर करणेही जमत नाही”, तापसी पन्नूच्या विचित्र वागणुकीवर भडकले नेटकरी, म्हणाले, “हिची वागणूक…”

View this post on Instagram

A post shared by Yasmin Karachiwala | Celebrity Fitness Instructor (@yasminkarachiwala)

या व्हिडीओमध्ये पिलाटेजबद्दल हेलन व यास्मीन बोलताना दिसत आहेत. ८५ व्या वर्षी आजही त्यांचा उत्साह बघता वय हा फक्त एक आकडा आहे. हे सिद्ध केले आहे. यामध्ये यास्मीनच्या देखरेखीखाली हेलन पिलाटे व्यायाम करताना दिसत आहेत. यानंतर हेलनबरोबर गप्पादेखील मारताना दिसत आहे.

आणखी वाचा -“चौकट सोडून काम करायची भीती वाटते आणि…”, कुशल बद्रिके असं का म्हणाला?, पोस्ट शेअर करत सांगितलं, “उगाच…”

हेलन यांनी सांगितले की, “माझ्यामध्ये खूप उत्साह आहे. मी खूप छान फील करत आहे. तसेच मी रोज नवीन दिवसाची वाट बघत असते. यामुळे मला खूप आनंद होतो. नशेसाठी मला दारू किंवा सिगरेटची गरज पडत नाही. पिलाटेज करुन मला खूप आनंद होतो. मला इथे यायला खूप आवडतं मी सर्व ट्रेनर्सची आभारी आहे. मी आता ८५ वर्षाची आहे आणि मी हे करत आहे”.

हेलन यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी सलीम यांच्याशी झालेल्या पाहिल्या भेटीबद्दलदेखील सांगितले. त्यांनी सांगितले की, “मी स्वतः माझ्या आयुष्यात खूप व्यस्त होते त्यामुळे मी सलीम यांच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. तेव्हा सलीम यांनी अजितना विचारले होते की या मॅडम कधीच कोणाला बघत नाही का? त्यावर ते म्हणाले की, “विचारू नका ती सगळ्यांनाच एखाद्या फर्निचरप्रमाणे बघते”. हे सगळं आठवून त्या भावूकदेखील झालेल्या दिसल्या.  

Tags: actressworkout
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
14 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क, कन्या व कुंभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुंतवणूक टाळावी, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.