झी मराठी वरील अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विनोदी मालिका कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. सासू -सुनेची छोट्या छोट्या किस्यांमधील मजेशीर जुगलबंदी या मालिकेत पहायला मिळते. आणि त्या दोघीं मध्ये त्यांच्या नवऱ्यांची जी फजिती होते ते बघणं फार रंजक ठरत. त्या मुळे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि सुकन्या मोने ही सासू सुनेची जोडी प्रेक्षकांना आपलीशी वाटते. (Swanandi Tikekar Sukanya Mone)
खऱ्या आयुष्यात सासू सुनेचं जे नातं असत की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, हे या मालिकेत अगदी मजेशीर पद्धतीने दाखवले आहे. कथांमधील तोच तोचपणा, तीच कट्करस्थान यापेक्षा काही तरी वेगळं या मालिकेत पहायला मिळालं. आणि सासू सुने मध्ये त्यांच्या नवऱ्यांची फजिती बघणं खूप रंजक ठरत. जगातील संपूर्ण नवरा वर्ग ते रिलेट करतो आहे.
पहा स्वानंदीची खास पोस्ट (Swanandi Tikekar Sukanya Mone)
परंतु अवघ्या चारच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याच संदर्भातील टीम सोबतचा एक व्हिडिओ स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने संपूर्ण टीम चे आभार मानले आहेत आणि कौतुक केले आहे. त्यात तिने असं म्हंटल आहे की, प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांचं काम उत्तम प्रकारे करून प्रत्येकासोबत आपुलकीच नातं देखील निर्माण केलं. खऱ्या अर्थाने आम्ही टीम आहोत.तिच्या या पोस्ट वर प्रेक्षकांनी कमेंट करून मालिका बंद करू नका, अशी विनंती करणाऱ्या अनेक कमेंट केल्या आहेत. प्रेक्षकांसोबत अभिनेत्री अक्षया नाईक आणि राधा सागर यांच्या देखील कमेंट पहायला मिळतायत. (Swanandi Tikekar Sukanya Mone)
सुकन्या मोने गेला अनेक काळ तितक्याच उत्सहाने काम करत आहेत. अनेक मालिका, चित्रपट,नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तर स्वानंदी देखील आताच्या अभिनेत्रीनं पैकी एक गुणी अभिनेत्री आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या वेगवेगळ्या फोटोशूट्स मुळे देखील प्रेक्षकांच्या नजरेत असते.
हे देखील वाचा : ‘आज तू सातासमुद्रापार…’ लेकीच्या आठवणीत सुकन्या मोनेंची खास पोस्ट