प्रत्येक पालकांचा जीव हा आपल्या मुलांमध्ये असतो.अनेकदा मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात किंवा आई वडिलांपासून दूर राहवं लागतं.असं काहीस झाला आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत . अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांची लेक ज्युलियादेखील कुटुंबापासून काही कारणास्तव दूर राहते, पण आज तिचा वाढदिवस आहे या निमित्त सुकन्या मोने यांनी एक भावुक पोस्ट केली.(sukanya mone)
अभिनेत्री सुकन्या मोने हे मनोरंजनसृष्टीप्रमाणेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात.ते नेहमी लेकीसाठी किंवा कुटुंबासोबतचे काही खास क्षण शेअर करत असतात.अशातच त्यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक क्युट फोटो शेअर करत स्पेशल पोस्ट केलीये. हॅपी बिर्थडे डिअर ज्युलिया, आज तू सातासमुद्रापार तुझा २१ वा वाढदिवस साजरा करते आहेस.आनंद ह्याचा आहे की तू तिकडे जाऊनही तुझं विश्व,तुझे मित्र मैत्रिणी संग्रही केलेस आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस साजरा करते आहेस.
====
हे देखील वाचा- “कपड्यांचे नखरे बघून, अशोफ सराफ मिलिंद गवळींना म्हणाले….”
====
खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना! असं म्हटलंय.तर त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत कलाकारंनी देखील जुलियाला शुभेच्छा दिल्यात.त्यांची लेक ही परदेशात असल्याचं या पोस्टमधून समजतंय. तर त्यांची मुलगी शिक्षणासाठी गेली का कि ती देखील आता मनोरंजन क्षेत्रात पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत असून अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.तर सुकन्या यांना आपण आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी, चूकभूल द्यावी घ्यावी, अशा अनेक मालिकांमधून त्या भेटीस आल्या. सध्या अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत पाहायला मिळतायत. (sukanya mone)

तर संजय मोने यांना आपण प्रपंच, खुलता कळी खुलेना, तुमची मुलगा काय करते अशा मालिकांमध्ये अभिनय करताय पाहिलंय. सुकन्या आणि संजय लेकीच्या करियरला कायम सपोर्ट करताना दिसतात. सुकन्या आणि संजय यांची लेक ज्युलियाला अभिनय करताना पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.तर तुम्हाला आईची लेकीसाठी केलेली खास पोस्ट आवडली का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.