Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडेचा प्रवास पाहिल्यादिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसह ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही ना काही घडतं, ज्याची सर्वत्र चर्चाही रंगते. गेल्या काही दिवसांपासून अंकिता व विकी जैन यांच्यात वाद सुरु होता. यामुळे ती बरीच खचलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिताने बरेचदा सुशांतची आठवण आली. त्यांच्याशी संबंधित गोष्टी सांगताना ती भावूकही झालेली पाहायला मिळाली. या सगळ्यात अंकिताला सुशांतची बहीण श्वेता व मित्र अली गोनी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
खरं तर, अंकिता लोखंडे विकी जैनबद्दल खूप सकारात्मक आहे.याबाबत तिने बरेचदा भाष्यही केलं आहे. विकी जैन तिला वेळ देत नाही या मुद्द्यावरुन तिचं भांडणही झालं आहे. अंकिताच्या सासूबाईंनीही ‘बिग बॉस’च्या घरात व घराबाहेर आल्यानंतर अनेक मुलाखतींद्वारे बरीच विधानं केली आहेत. मात्र सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह हिने अंकिताला सपोर्ट केलेला पाहायला मिळाला.

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंहने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने अंकिताबरोबरचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबर तिने लिहिले आहे की, ‘लव्ह यू अंकी. तू सर्वोत्कृष्ट व अतिशय शुद्ध मनाची व्यक्ती आहेस”. अंकिता सुशांत सिंहचा वापर करत आहे, वोट मिळण्यासाठी ती त्याची आठवण काढत आहे अशा बऱ्याच कमेंट प्रेक्षकांनी केलेल्या पाहायला मिळाल्या. सुशांत सिंहच्या पाठोपाठ अली गोनीनेही अभिनेत्रीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
अली गोनीने विकी, अंकिता व जास्मिन भसीनबरोबरचा एक ग्रुप फोटो शेअर करत लिहिले आहे की, “टीव्हीवर काय दाखवले जात आहे हे मला माहीत नाही, पण हे दोघे मला भेटलेले सर्वात चांगलं जोडपं आहे. तुम्हा दोघांना अजून बळ मिळो” असं म्हणत त्याने अंकिता व विकीला पाठिंबा दर्शविला आहे.