मराठी सिनेसुष्टीतील कलाकार मंडळी हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळाले. या चर्चेत आलेल्या कलाकारांच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे. सुरुची व पियुष ही जोडी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आली. दोघांनी लग्नाचे फोटो अचानक सोशल मीडियावरुन पोस्ट केल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघेही त्यांच्या लग्नामुळे बरेच चर्चेत आले. लग्नानंतर या जोडीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (Suruchi Adarkar Piyush Ranade Celebrate Holi)
मराठी सिनेष्टीतील ही लोकप्रिय जोडी सध्या त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही सुरुची व पियुष बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर दोघेही एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसले. तसेच एकमेकांसाठी खास पदार्थ बनवत ते एकमेकांची काळजीही घेताना दिसतात. सणा-सुदीला कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ही जोडी सण साजरे करतानाही दिसते. लग्नानंतर दोघांनीही कामाला सुरुवात केली.
अशातच सुरुची व पियुष यांनी होळी स्पेशल शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. होळी स्पेशल या व्हिडीओमध्ये दोघांनी एकमेकांना रंग लावून काही खास फोटो शेअर केले आहेत. शिवाय यंदाची ही होळी सुरुचीने तिच्या माहेरी साजरी केली असल्याचं तिच्या स्टोरीवरुन दिसत आहे. सुरुचीने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये तिच्या आई व भावाबरोबरचा पियुषने काढलेला सेल्फी पाहायला मिळत आहे. तर पुढील स्टोरीमध्ये आईच्या हातच्या पुरणपोळीचा फोटो तिने पोस्ट केला आहे. यावरुन सासरी जाणयासाठी सुरुचीच्या आईने होळी स्पेशल खास पुरणपोळीचा बेत केलेला पाहायला मिळाला.
सुरुची व पियुष यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या पियुष ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर सुरुची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये एकत्र काम करतानाचा पियुष व सुरुची यांची ओळख झाली. त्यांनतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि कालांतराने या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांनतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.