मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पाठारे. आजवर सुप्रिया यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. आजवर त्यांनी विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. सोशल मीडियावरही सुप्रिया पाठारे बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Supriya Pathare Video)
नुकताच सुप्रिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरी पूजेचं आयोजन केलेलं पाहायला मिळत आहे. या भव्य पूजा त्यांचा मुलगा मिहीरच्या हस्ते संपन्न झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुप्रिया यांच्या घरी भटजीबुवांच्या आशीर्वादाखाली आरती होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये धुपारत, दिव्यांची आरास, फुलांच्या माळा पाहायला मिळत आहेत.
‘शुभ सकाळ’ असं म्हणत सुप्रिया यांनी त्यांच्या घरी घातलेल्या पूजेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खूप मोठा थाटमाट असलेला पाहायला मिळत आहे. नेमकी ही पूजा सुप्रिया यांनी का घातली होती हे समोर आलेलं नाही. सुप्रिया यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर सुकन्या मोने यांनी कमेंट करत नमस्कार केला आहे. तर इतर चाहत्यांनी ही या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सुप्रिया पाठारे या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या नव्या व्यवसायामुळेही चर्चेत असतात. सुरुवातील फूड ट्र्कपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने हॉटेल पर्यंत धाव घेतली आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या लेकासह मिळून ‘महाराज’ हे नवं हॉटेल सुरु केलं आहे. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या या हॉटेलला भेट देत असतात. दरम्यान त्यांच्या या हॉटेलमध्ये कलाकारमंडळी पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावरुन व्हायरल झाले आहेत.