बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वैभव मांगलेंनी मुलांसाठी स्वतः बनवले पराठे, संपूर्ण रेसिपीही सांगितली, अभिनेत्याच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vaibhav Mangle Video

Video : वैभव मांगलेंनी मुलांसाठी स्वतः बनवले पराठे, संपूर्ण रेसिपीही सांगितली, अभिनेत्याच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह, मुलांसह वेळ घालवताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी कामामुळे घरापासून दूर असतात. मात्र जेव्हा ते घरी परततात तेव्हा ते त्यांचा क्वालिटी टाइम मुलांसह शेअर करतात. अशातच सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगलेही सध्या कुटुंबियांसह स्पेशल टाइम घालवताना दिसत आहे. तो त्याच्या मुलांसाठी म्हणजेच पौलोमी आणि मुलगा समीहन साठी खास पदार्थ बनवत आहे. (Vaibhav Mangle Video)

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्याच्या यादीत वैभव मांगले हे नाव आवर्जून घेतलं जात. याशिवाय गायन व सूत्रसंचालन यांसारख्या मनोरंजनाच्या क्षेत्रातही वैभव मांगले यांनी आपल्या कला कौशल्याची छाप पाडली. ‘अलबत्या गलबत्या’ व ‘इब्लिस’ या नाटकांतून वैभवने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण वैभवला खरी ओळख ‘फू बाई फू’ या टेलिव्हिजन शोमधून मिळाली. हा शो वैभवच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला.

आणखी वाचा – नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”

वैभव सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. याशिवाय वैभव न पटलेल्या मुद्द्यांवर टीका करत आपले मत मांडताना दिसतो. यावरून बरेचदा तो नेटकऱ्यांच्या कचाट्यातही सापडला आहे. मात्र वेळोवेळी त्याने नेटकऱ्यांनाही खडेबोल सुनावले आहेत. आता वैभवने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभवने त्याच्या मुलांसाठी खास पदार्थ बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

आणखी वाचा – मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाने धरला ठेका, मराठी कलाकारांसह केला जबरदस्त डान्स

हा व्हिडीओ शेअर करत “पराठा तितुका मेळावावा” असं कॅप्शन देत त्याने, “आज मी माझ्या मुलांसाठी पराठे कम लच्छा पराठा बनवत आहे. मी युट्युबवर रेसिपी पाहून पराठे बनवायला घेतले आहेत. पनीरचे पराठे मी बनवत आहे. याच पीठ फार वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. या पिठात बेकिंग पावडर, मीठ, दूध, दही हे पदार्थ आहेत. सारण बनवण्यासाठी मी पनीर, गाजर, शिमला मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, जिरं हे पदार्थ वापरले आहेत. अशाप्रकारे आमचे पराठे बनत आहेत” असं म्हटलं आहे. वैभव मांगले याने पराठे बनवतानाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

Tags: marathi actorvaibhav manglevaibhav mangle childrenvaibhav mangle instagram
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
bigg boss 17 ankita lokhande and vicky jain mother entry in the house give some suggestion to the wife husband

"दुनिया तुमच्यावर हसत आहे आणि...", अंकिता लोखंडेच्या आईने दोघांनाही सुनावलं, पण सासूसमोरच बायकोला ओरडला, म्हणाला, "तुला आयुष्यात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.