बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिला तेव्हा बोलताही येत नव्हतं अन्…”, वहिनीच्या आठवणीत रडू लागला हार्दिक जोशी, अभिनेत्याला म्हणालेली, “माझ्याकडून पैसे घ्यायला…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 5:42 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actor hardeek joshi started crying remembering his sister-in-law in jau bai gavaat show see the video actor hardeek joshi started crying remembering his sister-in-law in jau bai gavaat show see the video

"तिला तेव्हा बोलताही येत नव्हतं अन्...", वहिनीच्या आठवणीत रडू लागला हार्दिक जोशी, अभिनेत्याला म्हणालेली, "माझ्याकडून पैसे घ्यायला..."

‘झी मराठी’ वाहिनीवर ४ डिसेंबरला ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला असून या शोचे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. अल्पावधीतच या शोला खुप लोकप्रियता मिळाली आहे. अनेकांनी हा शो त्यांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या शोमध्ये अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत असतात, महेश मांजरेकर, कुशल बद्रिके यांच्यासह अनेकांनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. अशातच येत्या एपिसोडमध्ये या शोमध्ये अभिनेता सागर कारंडेचीदेखील पाहुणा म्हणून एण्ट्री होणार आहे. (Jau Bai Gavaat New Video)

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नुकताच या शोचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात सागर कारंडे हा त्याच्या ‘चला हवा येऊ द्या’ शोमधील गाजलेल्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या येण्याने शोमधील स्पर्धकांसह अनेकांनाच आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागरच्या पत्रवाचनाने अनेकांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रु निखळल्याचे पाहायला मिळाले होते आणि अगदी तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “दुनिया तुमच्यावर हसत आहे आणि…”, अंकिता लोखंडेच्या आईने दोघांनाही सुनावलं, पण सासूसमोरच बायकोला ओरडला, म्हणाला, “तुला आयुष्यात…”

या व्हिडीओमध्ये सागर या शोमधील स्पर्धकांसाठी त्यांच्या आई-वडिलांचे पत्र वाचून दाखवतात आणि हे ऐकून सगळेच भावुक होतात. यापुढे सागर हार्दिक जोशीसाठी एक खास पत्र वाचून दाखवतो आणि हे खास पत्र असतं त्याच्या वहिनीचं. त्यामुळे अभिनेत्याला रडू अनावर होते. यावेळी सागर त्याच्या वहिनीचे पत्र वाचत असे म्हणतो की, “प्रिय हार्दिक, तुझ्या संघर्षाच्या काळात तुला माझ्याकडून पैसे घ्यायला संकोच वाटायचा. तुम्ही राणादाची वाहिनी ना? हे एकूण मला खूप अभिमान वाटायचा.”

आणखी वाचा – “मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, “बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं…”

यावर प्रतिक्रिया देत हार्दिक असं म्हणतो की, “हा शो नुकताच प्रदर्शित होणार होता. पण वहिनीला तेव्हा बोलताही येत नव्हतं. तेव्हा हा शो सोडू नकोस असं म्हणत तिने मला शपथ घातली होती.” दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात हार्दिकच्या वहिनीचे निधन झाले होते. तेव्हा हार्दिकने वहिनीच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली होती. जाऊ बाई गावात हा शो हार्दिकने त्याच्या वाहिनीसाठी समर्पित केल्याची भावना त्याने व्यक्त केली होती आणि आता पुन्हा आपल्या वहिनीच्या आठवणीत हार्दिक भावुक झाला असल्याचे पाहायला मिळाले.

Tags: hardeek joshijau bai gavaatmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi sowजाऊ बाई गावातमराठी अभिनेतामराठी कार्यक्रममराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीहार्दिक जोशी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

Video : उदयपुरच्या पॅलेसमध्ये लुंगीवरच नाचू लागला आमिर खानचा मराठमोळा जावई, लेकही बेभान होऊन नाचत होती अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.