सासू-सूनांच्या कुरघोडीच्या मालिकांसाठी लोकप्रिय असलेला टीव्हीचं स्वरूप आता बदललं आहे. सासू-सूनांच्या या मालिकांच्या बरोबरीनेच आता अनेक रिअॅलिटी शोजदेखील पाहायला मिळत आहेत. याच रिअॅलिटी शोजद्वारे नावारुपाला आलेला एक लोकप्रिय चेहरा म्हणजे भारती सिंह. भारतीने आजवर अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आपले एक स्थान निर्माण केले आहे. आता ती ‘डान्स दिवाने’ या रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरी दीक्षित व सुनील शेट्टी या शोचे परीक्षक आहेत, तर भारती या शोचे निवेदन करत आहे. या शोमध्ये भारती कायमच सुनील शेट्टी व माधुरी दीक्षित यांच्या बरोबरच स्पर्धकांबरोबर मजामस्ती करताना दिसते.
सुनील शेट्टी व भारती हे या शोमध्ये अनेकदा एकमेकांबरोबर मज्जामस्ती करताना दिसतात. अशातच त्यांच्यातील या मज्जामस्तीचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये त्यांचा रोमँटिक आनंदांज पाहायला मिळत आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आपल्या खुर्ची वरून उठून भारतीकडे चालत येताना पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर तो भारतीसाठी नाचतही आहे. यानंतर तो स्टेजवर जाऊन तिचा किसही घेतो.
एका स्पर्धकाच्या डान्सवर प्रतिक्रिया दिल्यानंतर सुनील शेट्टी रोमॅंटिक डान्स करत स्टेजच्या दिशेने येतात. यावेळी त्याच्याच ‘धडकन’ या चित्रपटातील ‘दिल ने ये कहा दिलसे’ हे गाणे वाजते आहे. यानंतर सुनील शेट्टी स्टेजवर येऊन भारतीला किस करण्याचे नाटक करतो. त्यानंतर दोघांचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून माधुरी दीक्षितपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळेच जोरजोरात हसायला लागतात.
या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चंगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या एमोजीसद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी भारतीचे कौतुक ही केले आहे. दरम्यान, ‘डान्स दिवाने’ या शोद्वारे सुनील शेट्टीने पहिल्यांदाच रिॲलिटी शोमध्ये पदार्पण केले आहे. ते पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोचे परीक्षण करताना दिसत आहेत.