मराठी सिनेसृष्टीत बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या स्वमहेनतीवर काहीतरी करु पाहत आहेत. यांत अनेक कलाकारांनी स्वतःच घर खरेदी केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे तर काहींनी स्वतःची नवी कोरी गाडी खरेदी केल्याचं समोर आलं. नवीन घर घेणं आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वतःच घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कलाकार मंडळीही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. अगदी कमी वयात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी स्वतःचं नवं कोर घर घेतल्याचं समोर आलं आहे. (Girija Prabhu New Home)
अशातच एका मराठमोळ्या व लोकप्रिय अभिनेत्रीने एका महिनाभरापूर्वी नवं घर घेतलं असल्याची आनांदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. ही अभिनेत्री म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू. अगदी कमी वयात गिरीजाने स्वबळावर तिचं नवं घर घेतलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या तिच्या या कर्तृत्वाचं सर्वत्र कौतुकही करण्यात आलं. सोशल मीडियाद्वारे नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली.
मार्गशीष महिन्यात घरच्या घरी पूजा आटोपत तिने नव्या घराचे फोटो शेअर केले. त्यानंतर आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने तिच्या नव्या घराबाहेरील फोटो शेअर करत हटके नेमप्लेटचा फोटोही शेअर केला आहे. खणाची डिझाइन असलेल्या या नेमप्लेटवर गिरीजा प्रभू असं नाव लिहिण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. गिरिजाने स्वतःचा घराबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यावरुन गिरीजा तिच्या नव्या घरी राहायला गेली असल्याचं समोर आलं आहे.
गिरिजाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव करत अभिनेत्रीच कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. आता अभिनेत्री तिच्या या नव्या घराची झलक केव्हा दाखवणार याकडे साऱ्या चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.