बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने साऱ्या सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण मात्र अस्पष्टच राहिले. दरम्यान सुशांत सिंहचा मृत्यू हा मुद्दा आता पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. अमेरिकेत राहणारी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती सध्या मुंबईत आहे. तिच्या ‘पेन: पेन्स पोर्टल टू एनलाइटनमेंट’ या नवीन पुस्तकाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती भारतात आली आहे. यावेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. एका मुलाखतीत श्वेताने सीबीआयकडे सुशांतला न्याय देण्याची मागणी केली आहे. श्वेता म्हणाली की, जोपर्यंत या प्रकरणाचे सत्य सर्वांसमोर येत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लोजर मिळणार नाही. (Sushant Singh Rajput Sister Demands)
‘इंस्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली, “आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आमच्या लाडक्या सुशांतचे नेमके काय झाले. आणि हे आम्हा सर्वांना माहित असणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत आपल्याला हे माहित नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आपल्याला हे शोधून काढावे लागेल आणि या न्यायासाठी नेहमी याचना करत रहावे लागेल. आम्ही सीबीआयला सांगत राहू की, त्यांनी तपास सुरु ठेवावा आणि याचे लवकरात लवकर निकाल हाती यावेत”.
श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या भारत भेटीचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती सुशांतच्या अपार्टमेंट माउंट ब्लँकच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान यावेळी तिच्यासह अनेक लोकांचा जमाव जमला असून प्रत्येकजण सुशांतला न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी करताना दिसत आहे. याशिवाय काही व्हिडीओंमध्ये ती तिची मोठी बहीण राणी दीसह कन्याकुमारीच्या शिवमंदिरात जातानाही दिसत आहे.
श्वेताने तिच्या ‘पेन’ या पुस्तकात सुशांतचा उल्लेखही केला आहे. तिने सांगितले की, सुशांत त्याच्या कामात व्यस्त होता पण असे असूनही श्वेता २०१४ ते २०१७ पर्यंत दरवर्षी तिला भेटायला येत असे. दुर्दैवाने, ती २०१८ व १९मध्ये सुशांतला भेटू शकली नाही आणि २०२० मध्ये, तिला भेटण्यापूर्वीच अभिनेत्याचे निधन झाले.