‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर मालिकेने काही वर्षांचा लीप घेतलेला पाहायला मिळाला. मालिकेत काही वर्षांचा लीप येण्याआधी गौरी, जयदीप, शालिनी, उदय, माई या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस करत बांधून ठेवलं होतं. मालिकेत उदयची भूमिका करणारा अभिनेता संजय पाटीलने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही दिवसांपूर्वीच संजयने बाबा झाला असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. (Sanjay Patil Baby Girl)
होळीच्या दिवशी अभिनेत्याच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं.‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या संजय पाटीलला कन्यारत्न झालं. सोशल मीडियावर गोड असा फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअरही केली. यामध्ये अभिनेत्याने बायकोसह चिमुकल्या लेकीचा हात हातात घेत ही आनंदाची बातमी दिली.
त्यानंतर आता अभिनेत्याने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संजयने लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तिचा चेहरा दाखवला आहे. संजयच्या लेकीचं नाव राही असं आहे. राहीचा फोटो त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यापूर्वी अभिनेत्याने त्याच्या लेकीचा चेहरा कधीच दाखवला नव्हता. “राहीची नव्या जगाशी ओळख करुन देत आहे”, असं कॅप्शन देत त्याने हा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राही खूपच सुंदर व गोड दिसत आहे.
संजयची लेक राही आता सहा महिन्याची झाली आहे. संजयने त्याची बायको अबोली व लेक राहीबरोबर शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी पसंती दर्शविली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनीही कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गिरीजा प्रभू, मंदार जाधव, भक्ती रत्नपारखी या कलाकारांनी देखील कमेंट करत राहीचं कौतुक केलं आहे.