सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Appi Aamchi Collector मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट, अमोलला गंभीर आजार, फक्त दोन महिन्यांचाच कालावधी, नक्की काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 25, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee marathi appi aamchi collector serial new twist Amol knows that he has only two months left

Appi Aamchi Collector मालिकेत अमोलला त्याच्याकडे फक्त आता दोन महिने उरले आहेत असं कळलं आहे

मनोरंजनासाठी प्रेक्षकांचे अगदी जवळचे माध्यम म्हणजे टीव्ही आणि टीव्हीवरील मालिका. मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही आहे. आता या मालिकेमध्ये नवे वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे आणि या प्रोमोमधून सिंबा म्हणजेच अमोलकडे आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले आहे. (Appi Aamchi Collector New Twist)

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये सुरुवातीला एका मॅडमने अमोलचे कौतुक केल्याचे अर्जुन पोलिस स्टेशनमधील इतर सहकऱ्यांना सांगत आहे तर अप्पीही मला अमोलचा खूप अभिमान वाटतो असं म्हणत सिंबाचे कौतुक करत आहे. पण यापुढे अप्पी असं म्हणते की, अजूनही काही गोष्टी बदलत नाही आहेत”. यानंतर डॉक्टर अर्जुनच्या वाहिनीला अमोल विषयी धक्कादायक सांगते. याबद्दल डॉक्टर अर्जुनला काहीतरी गंभीर आजार झाला आहे असं म्हणत हा आजार दुसऱ्या स्टेजला आहे असंही सांगतात. हे ऐकून अर्जुनच्या वाहिनीच्या पायाखालची जमीनच सरकते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे घरी आल्यावर अर्जुनची वहिनी असं म्हणते की, “त्याला मी कसं सांगू की त्याच्याकडे फक्त दोनच महिने आहेत”. तिचे हे बोलणे अमोल ऐकतो आणि त्यालाही धक्काच बसतो. आता अमोलला झालेला हा गंभीर आजार नेमका काय आहे? आणि याबद्दल त्याला स्वत:लाच माहिती पडल्यामुळे तो आता यातून कसा बाहेर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत “मला काही झालं तरी चालेल. पण माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण” असं म्हटला होता.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालक, अभिजीत, अंकिता व जान्हवीला नको ती कामे सांगितली अन्…; व्हिडीओ व्हायरल

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल. ही गोष्ट अमोलला चुकूनही कळाली नाही पाहिजे. मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो बेशुद्ध पडतो. खोलीच्या बाहेर पडणाऱ्या अप्पीला अमोल बेशुद्ध पडलेला दिसतो. त्याला दवाखान्यात दाखल केले जाते. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी असल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा – “आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…”, ‘लापता लेडीज’ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, “आनंद आहे की…”

दरम्यान, मालिकेत नेमके पुढे काय होणार?, अमोलला नक्की काय झाले आहे?, अप्पी आणि अर्जुनचे नात्यामध्ये काय बदल होणार? आणि या सगळ्यामुळे मालिकेत कोणते नवे वळण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: appi aamchi collectormarathi serialMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Urmila Matondkar and Husband Mohsin Akhtar Mir Divorce

Urmila Matondkar Divorce : लग्नाला आठ वर्ष तरीही गरोदर का राहिली नाही उर्मिला मातोंडकर?, घटस्फोटाचं कळताच रंगल्या चर्चा, म्हणालेली, "त्याची अपेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.