शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानने ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “आजाराबद्दल त्यांना…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 19, 2024 | 2:57 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Suhani Bhatnagars mother said that Aamir Khan invited us for her daughters ira wedding

आमिर खानने 'दंगल'मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "आजाराबद्दल त्यांना..."

शनिवार १७ फेब्रुवारी रोजी ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूच्या अचानक आलेल्या वृत्ताने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार सुरु होते. यावेळी तिने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. या उपचारादरम्यान तिच्या शरीरात द्रवपदार्थ तयार होऊ लागले, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.

सुहानीच्या निधनाचे वृत्त येताच मनोरंजन सृष्टीतून अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले. अशातच काल (१८ फेब्रुवारी) रोजी अभिनेत्रीची आई-वडिलांनीदेखील त्यांची प्रतिक्रिया दिली. सुहानीला ‘डर्माटोमायोसिटिस’ हा दुर्मिळ आजार झाला असून तिला स्टिरॉइड्स देण्यात आले होते. मात्र या स्टिरॉइड्सने तिची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली. तिला या स्टिरॉइड्समुळे श्वसनाचा व फुफ्फुसाचा त्रास होऊ लागला आणि अखेर १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तिचे निधन झाले.

View this post on Instagram

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

अशातच सुहानीच्या आईने नुकतीच एक मुलाखत दिली, या मुलाखतीत आमिर खान हा कायम सुहानीच्या संपर्कात राहत असे व तो तिच्याबद्दल कायमच विचारपूस करत असल्याचे म्हटले. यावेळी सुहानीच्या आईने आमिरविषयी गौरवोद्गार काढत असं म्हटलं की, “आमिर सर आमच्या संपर्कात आहेत. ते खूप चांगले व्यक्ती असून ‘दंगल’ चित्रपटानंतरही ते कायम सुहानीच्या संपर्कात राहायचे. सुहानीविषयी ते कायम विचारपुस करत असत.”

आणखी वाचा – इतकी सुंदर दिसते राहुल वैद्य व दिशा परमारची लेक, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवला चेहरा, म्हणाला, “माझं जग…”

यापुढे सुहानीच्या आईने असं म्हटलं की, “आम्ही त्यांना सुहानीच्या आजाराबद्दल सांगितले नाही, कारण आम्ही स्वत: खूप काळजीत होतो. त्यामुळे आम्ही कोणालाच काहीच सांगितले नाही. आमिर खान यांना एखादी गोष्ट सांगितल्यास ते त्वरित प्रतिसाद देतात आणि आम्हाला वैयक्तिकरित्या कॉल करतात. त्यांनी सुहानीला कधीच एकटे सोडले नव्हते. त्यांच्या मुलीच्या (आयराच्या) लग्नासाठीही त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते आणि लग्नाला उपस्थित राहण्यास सांगितले होते.”

आणखी वाचा – Video : ‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीचा शाही विवाहसोहळा संपन्न, लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ व्हायरल  

दरम्यान, सुहानीच्या निधनाचे वृत्त कळताच कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी व तिच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. आमिर खाननेदेखील सुहानीच्या निधनावर ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले होते.  

Tags: सुहानी भटनागरसुहानी भटनागर मृत्यू बातमीसुहानी भटनागर आईआमिर खानबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीदंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरaamir khanbollywood actorbollywood actressbollywood newsDangal Fame Actress Suhani BhatnagarSuhani BhatnagarSuhani Bhatnagar Death NewsSuhani Bhatnagar Mother
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Actor Riteish deshmukh replies netizen who posted about late vilasrao-deshmukh says this is untrue see the details

"विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडली होती", वडिलांबाबत 'त्या' व्यक्तीने बोलताच रितेश देशमुख भडकला, उत्तर देत म्हणाला, "खोटं तुम्ही आधी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.