गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 23, 2026 | 11:13 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ayesha Khan Police Custody

"मी एक शब्दही बोलले नाही", आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, "घोषणाबाजी..."

Ayesha Khan Police Custody : रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्यावर जबरदस्त डान्स करणारी अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. NEET पेपर लीक प्रकरणासंदर्भात मुंबईत CJP च्या निषेधाला त्या समर्थन देत होत्या. आयशा खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणताना ऐकू येते, “मी रस्त्यावर शांतपणे उभी होते. मी एक शब्दही बोलले नाही. मी विरोध सुरूही केला नाही. पोलिसांनी मला आणि माझ्या मित्रांना ताब्यात घेतले आहे”. याच व्हिडीओमध्ये आयशाची मैत्रिण म्हणते, “माझं आज गणिताचं प्रॅक्टिकल आहे. मला कुठलेही कारण नसताना येथून दूर नेण्यात आले आहे”.

व्हिडीओमध्ये आयशा खान तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. तिला आणि त्याच्या साथीदारांना विनाकारण ताब्यात घेण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. आयशा म्हणाली, “या लोकांकडे उत्तरे नाहीत. मी फक्त रस्त्यावर उभी होते. त्यानंतर तीन-चार महिला पोलिसांनी मला ओढले, धक्काबुक्की केली आणि ताब्यात घेतले”.
आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला पोलिस आयेशा खानला पोलिस व्हॅनमध्ये ढकलताना दिसत आहेत. यादरम्यान आयशा याला विरोध करते आणि पोलिसांना प्रश्न विचारते. व्हॅनमध्ये बसल्यावर ती म्हणते, ‘मला तरी सांगा कुठे नेत आहात? ते आम्हाला कुठे घेऊन जात आहेत हे आम्ही आमच्या कुटुंबाला कसे सांगावे?’.

आणखी वाचा – CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

View this post on Instagram

A post shared by Ayesha Khan (@ayeshaakhan_official)

आयशा खानने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पोलिस स्टेशनमध्ये बसलेली दिसत आहे. ती म्हणाली, “आम्ही NEET विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आलो होतो. आम्ही फक्त रस्त्यावर उभे होतो. आम्ही कोणतीही घोषणाबाजी केली नाही आणि निदर्शनेही केली नाहीत. त्यानंतर पोलीस आले आणि म्हणाले की तुम्ही येथे आंदोलन करू शकत नाही. आम्ही त्यांना दुसरा मार्ग सांगण्यास सांगितले, पण आम्ही काही बोलायच्या आधीच त्यांनी माझ्या भावाला आणि मित्राला व्हॅनमध्ये बसवले”.

Tags: ayesha khanCJP ProtestPolice Custody
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.