अनेक कलाकार त्यांच्या विशिष्ठ कामासाठी ओळखले जातात. असाच एक कलाकार जो खास करून ओळखला जातो ‘बायोपिक’ या चित्रपटाच्या प्रसिद्ध विषयासाठी. एकापेक्षा जास्त प्रसिद्ध विभूतींचे बायोपिक साकारणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. एखादा बायोपिक म्हणलं कि सुबोध भावे हे नाव आपसूक प्रत्येकाच्या मुखावर येतं. सध्या सुबोध असाच एका बायोपिकच्या विषयावरून चर्चेत आहे. राहुल गांधी यांच्या आयुष्यावर बायोपिक करणार का? असा मुख्य प्रश्न सुबोध भावेला विचारण्यात आला त्यावर सुबोधने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे.(Subodh Bhave on Biopic Of Rahul Gandhi)
सध्या सर्वत्र एका कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे तो कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमात येतात. अभिनेता सुबोध भावेने देखील या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली या वेळी सुबोधला अवधूतच्या धारधार प्रश्नांचा देखील सामना करावा लागला. अवधूतने यावेळी सुबोधला राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करणार का असा प्रश्न विचारला उत्तर देत सुबोध भावे म्हणाला “मी ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी मुलाखतीला सुरुवात कशी करावी याचा विचार मी करत होतो त्यावेळी मला असं वाटलं आपण एवढे बायोपिक केले आहेत तर या मुलाखतीची सुरुवात देखील अशीच केली तर म्हणून मी त्यांना माझ्याकडे तुमचा बायोपिक आला आहे. तर त्यासाठी मला त्या भूमिकेचा आभ्यास करायचा आहे. मला जाणून घ्यायचं आहे राहुल गांधी कसे आहेत. या कल्पनेने मी राहुल गांधी यांच्या मुलाखतीची सुरुवात केली.(subodh bhave khupte tithe gupte)
हे देखील वाचा – “अभिनेता म्हणून टुकार, नीच माणूस” राहुल गांधींवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर शरद पोंक्षेंना काँग्रेसचं उत्तर, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विकृत…”
पुढे सुबोध ने बायोपिक निवडण्याबाबत असलेल्या स्वातंत्र्याबाबतही भाष्य केलं सुबोध पुढे म्हणाला “मी कुठल्या भूमिका करायच्या याचं मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते बघायचं कि नाही हे तुमचं स्वातंत्र्य आहे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची बळजबरी केलेली नाही. मी राहुल गांधी यांचा बायोपिक करतोय, भूमिका करतोय म्हणून तुम्ही तो पाहिलाच पाहिजे अशी कोणत्याही प्रकारची मी सक्ती केली नाही.
हे देखील वाचा – “राहुल गांधी यांचं आडनाव खान”, शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “आडनावाचा फायदा घेण्यासाठी…”
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आपल्या अनुभवाबाबत सांगताना सुबोधने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच मनोरंजनसृष्टीतील देखील अनेक अनुभव त्याने शेअर केले आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक आणि सुबोधने साकारलेल्या अनेक बायोपिक चित्रपटांबद्दल देखील सुबोधने या कार्यक्रमात भाष्य केलं आहे.(subodh bhave khupte tithe gupte)