अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेली वक्तव्य याआधी चर्चेचा विषय ठरली होती. आताही पुन्हा एकदा शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राहुल गांधी यांचं आडनाव गांधी नसल्याचा दावा केलं आहे. इतकंच नव्हे तर गांधी आडनावाचा ते वापर करत असल्याचं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या मालेगाव इथे भारतीय विचार मंचातर्फे प्रबोधन व जनजागृतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पोंक्षे सावरकर यांच्यावर व्याख्यान देत होते. या व्याख्यानादरम्यानच त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी भाष्य केलं.
आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला भारतीय जवानाचा ‘तो’ भावुक व्हिडीओ, म्हणाला, “आई-बापाच्या पायावर…”
शरद पोंक्षे राहुल गांधीबाबत म्हणाले, “राफेल प्रकरणामध्ये सुप्रिम कोर्टामध्ये केस गेली. तिथे माफी मागून आला (राहुल गांधी). जिथे अपील करायची संधी आहे तिथे मी सावरकर नाही गांधी आहे म्हणून सांगतो. एकतर तू गांधी पण नाही. तुझ खरं नाव खान आहे”. शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचं आडनाव खरं नसल्याचं उघडपणे सांगितलं.
आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर शिक्षणात अव्वल, स्वतःच सांगितलं किती झालं आहे शिक्षण?
पुढे ते म्हणाले, “हे काय महात्मा गांधींचे वंशज नव्हे. आडनावाचा फायदा घेण्यासाठी हे आडनाव वापरण्यात आलं आहे. ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ आहे”. आता शरद पोंक्षे यांच्या या विधानानंतर कोणत्या नव्या वादाला तोंड फुटणार का? हे पाहावं लागणार आहे.