अभिनेते शरद पोंक्षे व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामध्ये आता नवा वाद रंगला आहे. मालेगावमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एक भाष्य केलं. राहुल गांधी यांचं आडनाव गांधी नसून ते खान आहेत असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शरद पोंक्षे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावर ट्वीट केलं आहे. तसेच त्यांच्यावरील राग व्यक्त केला आहे. अतुल लोंढे यांनी ट्वीट करत म्हटलं की, “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे”.
हा विकृत पोंक्षे अजुन काय बोलू शकतो
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 16, 2023
नथुरामची अवलाद… pic.twitter.com/5XJu1wcaU4
तर जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “हा विकृत शरद पोंक्षे अजुन काय बोलू शकतो. नथुरामची अवलाद”. ट्वीट करताना जितेंद्र आव्हाड यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचं पोस्टर शेअर केलं आहे. तसेच त्यांनी शरद पोंक्षेंचा फोटोही ट्वीट केला आहे. शरद पोंक्षे यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच
— Atul Londhe Patil (@atullondhe) August 16, 2023
पण माणूस म्हणून ही नीच आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे भारतीय विचार मंचच्या वतीने शरद पोंक्षे यांचं सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अध्यक्षपदी होते. यावेळी राहुल गांधी यांचं आडनाव खान आहे आणि ते गांधी आडनावाचा वापर करत असल्याचं शरद पोंक्षेंनी म्हटलं. आता हा वाद आणखीन कितपत पोहोचणार हे पाहावं लागेल.