मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक दर्जेदार चित्रपट येत असतानाच गेल्या अनेक महिन्यांपासून एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे दिग्पाल लांजेकर यांचा ‘श्री शिवराज अष्टक’ मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’. सिंहगड किल्ल्यावरील लढाई आणि या लढाईचे मुख्य शिलेदार सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुरलेले आहे. येत्या २५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. (Subhedar Movie)
जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली होती, तेव्हापासून या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे आतापर्यंत अनेक पोस्टर, गाणी व ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला नुकतंच सुरुवात झाली असून प्रदर्शनाआधीच ‘सुभेदार’ चित्रपटाने एक नवा विक्रम केला आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले असून चित्रपटाची टीम सध्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ‘बुक माय शो’वर तब्बल ४० हजारांहून अधिक प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी इंटेरेस्टेड असल्याचं दाखवलं आहे. असा विक्रम करणारा ‘सुभेदार’ चित्रपट पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
हे देखील वाचा – “आईच्या निधनादिवशीच तिने बिर्याणी खाल्ली अन्…”, आदिल खानचा राखी सावंतबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला, “आई गेल्यावर ती…”
चित्रपटाच्या टीमने त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं असून या पोस्टरसोबत पोस्टमध्ये लिहिलंय, “तुमच्या प्रेमामुळे ‘सुभेदार’ चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट ‘सुभेदार’ !” चित्रपटाच्या या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंटद्वारे आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Subhedar Movie creates A New Record before Released)
हे देखील वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर हिंदीमधील खलनायिका साकारणार, प्रोमो पाहताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “भूमिकेसाठी वाईट…”
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, अस्ताद काळे असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.