मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंड लेव्हलला उतरून नेहमीच काम करत असतात. अशातच सोमवारी रात्री ते परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. हा कार्यक्रम आटोपताच त्यांनी केईएम रुग्णालयाला धावती भेट दिली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले आहेत. रुग्णालयातील लोकांच्या, रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाची धावती भेट घेतली. (Abhijeet Kelkar On Eknath Shinde)
या भेटीत त्यांनी केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा कक्ष, वैद्यक विभागाचा कक्ष याचबरोबर केईएम रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम सुरू असलेल्या कक्षांना भेटी दिल्या. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केईएम रुग्णालयातील विविध समस्यांचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने या समस्या दूर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे काम पाहून मराठी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने त्यांचं कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस’ फेम अभिजित केळकर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारी अभिजीतची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
अभिजित केळकरचा सोशल मीडियावरील वावर खूप मोठा आहे. प्रत्येक घडामोडींवर अभिजित स्वतःच मत स्पष्टपणे व्यक्त करत असतो. नुकतीच त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कौतुक करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत पोस्ट केली आहे. अभिजीतने इन्स्टाग्राम स्टोरीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केईएम रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीचा व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने लिहिलं आहे की, “इतक्या ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री.” अभिजीतची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
आणखी वाचा – प्रदर्शनापूर्वीच ‘सुभेदार’ चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, रचला नवा विक्रम
अभिजित सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या मुलांचे अनेक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.