सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची रेलचेल सुरु असलेली पाहायला मिळतेय. सगळीकडेच गणेशोत्सव हा धुमधडाक्यात साजरा केला जातो आणि त्यासाठी सगळेचजण उत्सुक असलेले पाहायला मिळतात. कोणत्याही सणासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते तितकीच भीती नियम व अटींसाठीही असते. आता गणेशोस्तव येतोय तर सार्वजनिक मंडळांतर्फे सरकारकडून विशेष परवानगी घेतली जाते. अशातच यंदा पुण्यात गणेशोत्सवासाठी रात्री बारापर्यंत स्पीकरचा वापर करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने नुकताच हा निर्णय जाहीर केला असून या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. (Vaibhav Mangale On Ganeshotsav)
प्रेक्षकांमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण असलं तरी पुणे प्रशासनाने दिलेला हा निर्णय एका अभिनेत्याला खटकला आहे. मराठी सिने इंडस्ट्रीतील सर्वगुणसंपन्न अभिनेते वैभव मांगले यांना पुणे प्रशासनाचा निर्णय खटकला आहे. वैभव मांगले यांनी आजवर कोणत्याही विषयावर निर्भीडपणे व स्पष्टपणे वक्तव्य आजवर केलेलं आहे. अशातच त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी एक प्रश्न पुणे प्रशासनाला विचारला आहे.
गणेश मंडळांना ध्वनीवर्धकासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली असल्याची बातमी त्याने पोस्टमध्ये शेअर केली असून, “हे काय चाललंय काय??… आणि मग सवाई महोत्सवाला १० माझे पर्यंतच का??” असा प्रश्न उपस्थित केला आहे. वैभव मांगले यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टचे समर्थन केले आहे.
आणखी वाचा – ‘केबीसी १५’ चा पहिला करोडपती ठरला पंजाबचा २१ वर्षीय युवा, जिंकेल का ७ करोड?
नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत, एका युजरने कमेंट करत, “सवाई मध्ये जर तुम्ही धांगडधिंगा कराल तर ते तुम्हाला परवानगी देतील” असं म्हटलं आहे, तर आणखी एकाने, “राजकारण्यांच्या स्वप्नातला सुसंस्कृत महाराष्ट्र हा असा असणार”, अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने खोचक टोला लगावत, “कारण इथूनच राजकारण्यांना ‘कार्यकर्ते’ मिळतात, सवाई मधून काय मिळणार” असा प्रश्न केला आहे.