शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती…”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची कौतुकास्पद पोस्ट, म्हणाल्या, “या क्षणाबद्दल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 23, 2023 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Rangole On Mrinal Kulkarni

“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती...”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची कौतुकास्पद पोस्ट, म्हणाल्या, “या क्षणाबद्दल...”

सध्या सिनेमासृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटाची. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांचं कुलकर्णी कुटुंब मोठा पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. या चित्रपटातून त्यांचं ऑनस्क्रीन बॉण्डिंग तर पाहायला मिळणारच आहे, मात्र त्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंगचेही अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. आई मुलाच्या नात्यापेक्षा सासू सुनेचं नातं हे कुलकर्णी कुटुंबात अधिक घट्ट असलेलं पाहायला मिळतं. (Shivani Rangole On Mrinal Kulkarni)

सासू व सुनेच्या खास बॉण्डिंगच्या अनेक पोस्ट त्या नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अशातच शिवानीने सासूबाईंचं कौतुक करणारी एक खास पोस्ट इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. शिवानी रांगोळेने लाडक्या सासूबाईंचे कौतुक करत सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सासूबाईंचं कौतुक करण्यासाठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्ट मध्ये तिने त्या दोघींचे एकत्र पारंपारिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत. आणि त्याखाली कॅप्शन लिहीत तिने म्हटलं आहे की, “समस्त शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी ताई आहे याचा अभिमान आणि आनंद, ‘सुभेदार’ चित्रपटात एकत्र काम करून द्विगुणित झाला! या क्षणाबद्दल दिग्पाल लांजेकर यांचे खूप खूप धन्यवाद!!!”

आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचं मराठी कलाकारांना कौतुक, फोटो पाहताच निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझ्यासारखा मुलगा…”

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांनी लगीनगाठ बांधली. अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. शिवानी व मृणाल या सासू सुनांपेक्षा मैत्रिणी जास्त आहेत. शिवानी मृणाल यांना ताई या नावाने हाक मारते. मृणाल कुलकर्णी यांनी संपूर्ण शिवराज अष्टत मालिकेत राजमाता जिजाबाईंची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये, शिवप्रेमींमध्ये त्यांची ‘आऊसाहेब’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – “गुडघा दुखतोय का?”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स, अभिनेत्री म्हणते, “पोजेस देणं…”

‘सुभेदार’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी ‘राजामाता जिजाऊ’ यांच्या भूमिकेत, तर शिवानी रांगोळे सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत तर विराजस कुलकर्णी बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर समूहात ‘जीवा’ ही भूमिकेत दिसणार आहे.

Tags: entertainmentmrinal kulkarnishivani rangoleSubhedar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Girish oak father passed away

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, वडिलांच्या निधनानंतर भावुक होत म्हणाले, “जातानाही तुम्ही आम्हाला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.