शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, वडिलांच्या निधनानंतर भावुक होत म्हणाले, “जातानाही तुम्ही आम्हाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 23, 2023 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Girish oak father passed away

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, वडिलांच्या निधनानंतर भावुक होत म्हणाले, “जातानाही तुम्ही आम्हाला...”

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचं नाव आदराने घेतलं जातं. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर ते ‘…कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. दरम्यान गिरीश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर दुःखद बातमी शेअर केली. गिरीश यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. ते ९३व्या वर्षांचे होते. वडिलांच्या निधनानंतर गिरीश यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

गिरीश यांनी वडिलांचा फोटो शेअर करत म्हटलं की, “काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक यांचं वयाच्या ९३व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे-मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात. तसेच तेही माझे होतेच. माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनीअर या पदावर ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही”.

आणखी वाचा – “एवढा मोठा निर्णय तू…”, सासूबाईंनी दुसरं लग्न करताच मिताली मयेकरने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या सासूचं लग्न हे…”

“याव्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत, फ्रेंच, जर्मन स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा यायच्या. ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे. कपड्यांना इस्त्री, सायकल, स्कूटर, घड्याळं, घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे. तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो. माझी आई गमतीनी म्हणायची ती, मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत, नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं.  अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं”.

आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचं मराठी कलाकारांना कौतुक, फोटो पाहताच निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझ्यासारखा मुलगा…”

पुढे ते म्हणाले, “ते बासरी व माउथ ॲार्गन छान वाजवायचे. ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला. पण मीच कंटाळा केला. रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो. अन्नाची पाण्याची विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे. या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली. काय काय आणि किती सांगू. आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा. बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो”. गिरीश यांच्या पोस्टनंतर चाहत्यांसह कलाकार मंडळी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Tags: entertainment newsgirish oakmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Ravi Jadhav On Hemangi Kavi

"छोटीशी भूमिका तरीही…", 'ताली'मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, "तिने ज्या प्रकारे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.