सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या फोटोशूटचे लाखो चाहते दिवाने आहेत. नवनवीन हटके पोज देत फोटोशूट करून ते सोशल मीडियावरून कायमच शेअर करत असतात. अशात काही वेळेला कामामुळे या कलाकारांना फोटोशूट करणं शक्य होतं नाही, तेव्हा मात्र प्रेक्षकवर्ग या कलाकारांच्या फोटोशूटला मिस करताना दिसतात. फोटोशूटच्या बाबतीत अग्रस्थानी असेलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताच्या फोटोशूटचे कित्येक चाहते दिवाने आहेत. अशातच प्राजक्ताने बरेच दिवस फोटोशूट केलं नाही, त्यामुळे तिच्या फोटोशूटकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. (Prajakta Mali New Photoshoot)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकल. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. बऱ्याच दिवसांनी प्राजक्ताने तिच्या फोटोशूटची एक झलक सोशल मीडियावरून शेअर केली आहे. या फोटोंसह तिने म्हटलं आहे की, ‘बॅक टू पॅव्हेलियन’, ‘पोसिंग स्टार्ट’ असं म्हटलं आहे. प्राजक्ताच्या या नव्या फोटोशूटमध्ये तिने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला असून “ऍक्वा ब्ल्यू’ रंगाची साडी नेसली आहे. बरं या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने दिलेल्या पोज साऱ्यांना भुरळ घालत आहेत.
बऱ्याच चाहत्यांनी प्राजक्ताच्या या नव्या फोटोशूटला पसंती दर्शविली आहे. प्राजक्ताने गुडघ्यावर हात ठेवून पोज देत फोटो काढला आहे, यावर नेटकऱ्यानी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने गमतीशीर कमेंट करत म्हटलं आहे की, ‘गुडघा दुखायला का’? तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, ‘पाय दुखत आहे का’?.
आपल्या मनमोहक अदाकारीने प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात घर केलेच आहे. प्राजक्ताच्या या नव्या साडीतील फोटो चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहेत. या साडीतील फोटोंमध्ये प्राजक्ताचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.