स्टार प्रवाह वाहिनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. स्टार प्रवाह वाहिनी वरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या वाहिनी वरील सर्वच मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असतात. गेले काही दिवस ‘ठरलं तर मग’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. प्रेक्षकांनी सायली व अर्जुनच्या जोडीला डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेच्या कलाकारांबरोबरच मालिकेचं कथानक ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय. (Star Pravah Tharla Tar Mag Serial 300 Episodes)
मालिकेतील अर्जुन अर्थात अभिनेता अमित भानुशाली याने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालिकेतील सगळ्या कलाकारांनी आणि मालिकेच्या संपूर्ण युनिटने केक कापत हा क्षण खूपच उत्साहात व आनंदात साजरा केला. अमितने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली ‘सेटवरील ३०० भागांचं सेलिब्रशन’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. या व्हिडीओखाली अभिनेत्री रेश्मा शिंदे, जुई गडकरी तसेच मालिकेच्या चाहत्यांनी कमेंट्स करत मालिकेला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
आणखी वाचा – मराठी मालिकेत अपघात सीन असे होतात शूट, थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री हवेत लटकत होती अन्…
‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या एकामागोमाग एक टर्निंग पॉईंट्स येत आहेत. मालिकेत सायली गरोदर असल्याचे खोटं चित्र सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे अर्जुन व सायलीची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सायलीच्या गरोदरपणामुळे अर्जुनची आई व पूर्णाआजी आनंदी आहेत. तर अस्मिता व प्रिया यांना सायली-अर्जुनविषयी शंका येत आहे. त्यामुळेच अस्मिता व प्रिया सायलीविरोधात कटकारस्थाने करताना दिसत आहेत. दरम्यान मालिकेतील सायली-अर्जुन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे आणि म्हणूनच ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी झाली आहे.
दरम्यान, सायलीच्या खोट्या गरोदरपणामुळे मालिका आता रंजक वळणावर आली असून सायलीचा हे खोटं गरोदरपण घरातल्यांसमोर येणार का? आणि सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार का? हे पाहणे मालिकेत उत्सुकतेचं ठरणार आहे.