शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “गर्भवती महिलांनी…”, ‘त्या’ फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचे सडेतोड उत्तर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “खूपच त्रासदायक…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 8, 2023 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rubina Dilaik answered to Trollers

Video : "गर्भवती महिलांनी…", 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचे सडेतोड उत्तर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "खूपच त्रासदायक…"

हिंदी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आली आहे. रुबिना व तिचा पती अभिनव शुक्ला लवकरच आई-बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वी रुबिनाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. तेव्हापासून ती यासंबंधीची प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सध्या ती तिचा गरोदरपणाचा टप्पा व्यतित करताना दिसत असून ती तिच्या तब्येतीची विशेष काळजी घेताना दिसते. ती या काळात व्यायाम करण्याबरोबरच तिच्या आहाराबाबत विशेष लक्ष देते. त्याचबरोबर, ती सोशल मीडियावर अनेक फोटोशूट करतानाही दिसून येते. (Rubina Dilaik answered to Trollers)

काही दिवसांपूर्वी रुबिनाने पती अभिनवसह गरोदरपणातील फोटोशूट केले होते, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले होते. आता तिने एक व्हिडीओ शेअर करत या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे देखील वाचा – जान्हवी कपूरच्या अफेअरची जोरदार चर्चा, सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करत असल्याचं पक्कं, ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष

रुबिनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती संत्री खाताना दिसते. गुलाबी रंगाचा साधा ड्रेस आणि डोळ्यात चष्मा असा पेहराव तिने केला होता. या व्हिडिओला तिने “हा व्हिडीओ त्या लोकांसाठी आहे. जे गर्भवती महिलांनी अश्या गोष्टी नाही केल्या पाहिजे वगैरे, अश्या प्रकारच्या कमेंट्स करतात.”, असं कॅप्शन दिलं आहे. तर या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “खूपच त्रासदायक, खूपच नकारात्मकता, त्यांनी इथून निघून जाणे पसंत करावे.” तिच्या या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत अभिनेत्रीचं कौतुक करत आहे.

हे देखील वाचा – “म्हातारा भाईजान बुटक्याला…”, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सलमान व आमिर खानची उडवली खिल्ली, म्हणाला, “सुपरफ्लॉप…”

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

याआधीही रुबिनाने या काळातील अनेक फोटोशूट केले होते. काही दिवसांपूर्वी तिने काळ्या रंगाच्या टाइट-फिट जंपसूटमध्ये एक फोटोशूट शेअर केला होता. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. मात्र, तिच्या या फोटोशूटमुळे तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता तिने या व्हिडिओतून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. रुबिना गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीत सक्रिय असून तिने ‘बिग बॉस’सह अनेक मालिकांमध्ये दिसली. सध्या ती ब्रेकवर असून ती या गरोदरपणाचा आनंद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, रुबिनाची बहीण देखील लवकरच आई होणार असल्याची गुड न्यूज तिने तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

Tags: hindi tv actressrubina dilaikRubina Dilaik answered to TrollersRubina Dilaik Maternity Photoshoot
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Urfi Javed visits Amritsar

'त्या' बनावट व्हिडीओ प्रकरणानंतर सुवर्ण मंदिरात पोहोचली उर्फी जावेद, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.