thod tuz aani thod maz off air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन मालिका आणि वेगळं कथानक घेऊन येते. त्यामुळेच प्रेक्षकांचं विशेष लक्ष या वाहिनीच्या मालिकांकडे वेधलं जातं. अलीकडेच स्टारप्रवाहने एकाच वेळी दोन नवी मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’. या मालिकांच्या प्रोमोना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.पण या नवीन मालिकांच्या आगमनामुळे वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका प्रेक्षकांना निरोप देणार आहे. ती मालिका म्हणजे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’.काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सुर्वेने भावुक पोस्ट करत मालिकेला निरोप दिला होता.
आता मालिकेतील आणखी एक अभिनेत्री सखी गुंडये हिनेही भावुक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सखीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने असं म्हटलं आहे की, “‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही माझी पहिली मालिका आणि पहिल्याच मालिकेत मिळालेली छान भूमिका तसेच एवढी सुंदर टीम. या प्रोजेक्टच्या निमित्ताने कसून काम करणारी आणि कॅमेऱ्यामागे तेवढीच धमाल करणारी माणसं मी पाहिली. एक-दीड महिना उशिरा जॉइन होऊनही त्यांनी मला कधीच वेगळं वाटू दिलं नाही”.
पुढे तिने म्हटलं आहे की, “एवढी मजा, एवढी मस्ती, इतके लाड, एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेटवर मिळेल की नाही माहीत नाही. पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल. पुढे तिने लिहिलं, या कामासाठी मी अपर्णा मॅम आणि अतुल सरांची कायम ऋणी राहीन. अर्थात हा पूर्णविराम नाही. या माणसांशी पुढे अनेक प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने किंवा सहज भेटीगाठी होत राहतील. पण ‘थोडं तुझं थोडं माझं’ कायम खास राहील”. या पोस्टमधून सखीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लपंडाव व नशीबवान या मालिका स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांसाठी भेटीस येणार असल्याने अनेकांच्या आवडत्या मालिका ऑफ एयर जाणार आहेत. आता या नव्या मालिकांना प्रेक्षक किती प्रेम देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. पण असं असलं तरी या ऑफ एअर जाणाऱ्या मालिकांना प्रेक्षक किती मिस करणार हे पाहणंही रंजक ठरेल.





