मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ही एक प्रकारची फसवणूक आहे”, OLA कडून होणाऱ्या त्रासांनंतर मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, “वेळेवर पैसे देऊनही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2025 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mumbai cab service issues

"ही एक प्रकारची फसवणूक आहे", OLA कडून होणाऱ्या त्रासांनंतर मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, "वेळेवर पैसे देऊनही…"

mumbai cab service issues : अनेक कलाकार आहेत जे वेळोवेळी त्यांचे चांगले, वाईट अनुभव चाहत्यांसह शेअर करतात. बरेचदा हे कलाकार ट्राफिक मध्ये आलेल्या अडचणी, प्रवासादरम्यान आलेले अनुभव तसेच इतरही काही समस्या शेअर करतात. अशातच एका अभिनेत्री आणि लेखिकेने ओला या प्रवासी कंपनीवर आक्षेप घेत आवाज उठविला असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री व लेखिकेने केलेली पोस्ट एका लोकप्रिय कॅब कंपनीबद्दल केलेल्या तक्रारीची आहे. ही अभिनेत्री व लेखिका म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. मधुगंधाने तिला सहन कराव्या लागलेल्या त्रासाविषयी सोशल मीडियाद्वारे भाष्य केले आहे.

अभिनेत्रीने Ola या कॅब कंपनीच्या सेवेचा वापर केल्यानंतर नियमित बिल भरुनही दंड भरण्यासाठी सतत मॅसेज केल्याप्रकरणी आवाज उठविला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी ओला पोस्टपेड ग्राहक आहे. माझे बिल 4 सप्टेंबर 2025 रोजी भरायचे होते, परंतु मी 31 ऑगस्ट 2025 रोजी आधीच पेमेंट केले. असे असूनही, मला अजूनही ओला टीमकडून 100 रुपयांचा दंड भरण्याचे मेसेज वारंवार येत आहेत आणि मी एकूण 601 रुपये भरले आहेत. मी आधीच पुराव्यासह आणि पेमेंट केल्याच्या स्क्रीनशॉटसह तीन ईमेल पाठवले आहेत, तरीही कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही”.

आणखी वाचा – Paaru Serial Promo : अखेर अहिल्यासमोर आलं आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य, दोघांनाही घराबाहेर काढलं आणि…; मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)

पुढे तिने म्हटलं आहे की, “बहुतेक ओला ड्रायव्हर्स गाडी चालवताना सतत फोनवर बोलत असतात, जे आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. आता, वेळेवर पैसे भरल्यानंतरही मला दंड भरावा लागेल अशा मेसेजद्वारे त्रास दिला जात आहे. ओला कंपनीकडून ग्राहकांना अशीच वागणूक दिले जाते का? ही एकप्रकारची फसवणूक आहे का? बऱ्याचदा जेव्हा तुम्ही पेमेंट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा मेसेजमध्ये असलेली लिंक कामी येत नाही. जेणेकरुन आपल्याला पेमेंट करायला उशीर व्हावा आणि त्यामुळे ते दंडाची रक्कम वसूल करू शकतात, असे तर नाही ना?”.

आणखी वाचा – गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक

मधुगंधाने संबंधित कॅब सर्व्हिस कंपनीला या पोस्टमध्ये टॅगही केले आहे. ओला कॅबच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या पोस्टवर अशी कमेंट करण्यात आली आहे की, “मधुगंधा कुलकर्णी, आम्हाला विश्वास आहे की तुमची चिंता दूर करण्यात आली आहे आणि त्याविषयी तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे. अपडेटसाठी कृपया ईमेल पाहा. तुम्हाला काही मदत हवी असल्यास DM द्वारे आमच्याशी संपर्क साधा”.

Tags: marathi actresssmumbai cab serviceola company
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi actor Prashant Damle

१३,३०० प्रयोग, ३९,९०० तास स्टेजवर आणि…; प्रशांत दामलेंच्या कारकिर्दीला संकर्षण कऱ्हाडेचा सलाम, म्हणाला, "वयाच्या ६४व्या वर्षी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.