शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Serial Promo : अखेर अहिल्यासमोर आलं आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य, दोघांनाही घराबाहेर काढलं आणि…; मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 11, 2025 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
paaru serial Promo

Paaru Serial Promo : अखेर अहिल्यासमोर आलं आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य, दोघांनाही घराबाहेर काढलं आणि…; मोठा ट्विस्ट

paaru serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. मालिकेत आलेल्या आजवरच्या प्रत्येक ट्विस्टने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं. पारू आणि आदित्यच्या जोडीला प्रेक्षकांनाही अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सध्या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत आदित्यची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करांची थोरली सून आणण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशातच आदित्य लवकरच लग्नबंधनात आहे. अहिल्यादेवींनी आदित्यसाठी बायकोची निवड केली आहे. आणि अखेर साखरपुड्याचा तो दिवस आला आहे.

आदित्य साजिरीच्या हातात अंगठी घालतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. यावेळी साखरपुड्याच्या मंडपात सयाजी म्हणजेच अहिल्यादेवीच्या भावाची एंट्री होते. ते आदित्यला साजिरीच्या हातात अंगठी घालण्यापासून रोखतात. तुझ्या मनात नेमकं काय आहे हे सत्य तू अहिल्याला सांगितलं पाहिजे असं म्हणते ते आदित्यला सावध करतात. हीच योग्य वेळ आहे असा सल्ला सयाजी त्याला देतात. यानंतर बावरलेला आदित्य कसालाही विचार न करता पारूचा हात धरतो आणि दोघंही अहिल्यासमोर उभे राहतात.

आणखी वाचा – गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आदित्य आणि पारूला समोर पाहून अहिल्यालाही मोठा धक्का बसतो. आदित्य मन घट्ट करुन म्हणतो, “आई माझं पारूवर प्रेम आहे. आमचं लग्न झालंय”. पारू गेली कित्येक महिने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालत असते. ते सुद्धा ती अहिल्याला दाखवते. हे सगळं पाहून अहिल्या प्रचंड संतापते. आणि म्हणते, “आदित्य…! या अहिल्यादेवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरीही नाही”. अहिल्याच्या रौद्ररुपाचा आता अंत होतो.

आणखी वाचा – कॅन्सर ट्रीटमेंटदरम्यान दीपिका कक्करच्या रक्त तपासणीचे रिपोर्ट समोर, पाहताच अभिनेत्रीच्या डोळ्यांत पाणी, नवऱ्याने सांत्वन केलं आणि…

ती आदित्यच्या कॉलरला पकडून त्याला घराबाहेर काढते, तर आदित्य पारूचा हात धरून दोघेही बाहेर येतात. आता अहिल्यादेवीचा सामना पारू आणि आदित्यला करावा लागणार आहे. अहिल्याने बाहेर काढल्यानंतर आता पारू व आदित्य कुठे राहणार?, त्यांचं प्रेम अहिल्याचे मन जिंकणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
mumbai cab service issues

"ही एक प्रकारची फसवणूक आहे", OLA कडून होणाऱ्या त्रासांनंतर मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, "वेळेवर पैसे देऊनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.