Jaan Kumar Sanu slams Kunickaa Sadanand : कुनिका सदानंद सध्या ‘बिग बॉस १९’ मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’शिवाय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आणि गायक कुमार सानू यांच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. या संदर्भात, अभिनेत्रीच्या मुलाने एका मुलाखतीत कुमार सानू यांच्याबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. सध्या सोशल मीडियावर कुनिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिनं मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींविषयी मोठं विधान केलं आहे, ज्यावर कुमार सानूचा मुलगा जान सानू यानं प्रतिक्रिया दिली आहे.
कुनिका सदानंद हिनं काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल अनेक गोष्टी उघडपणे सांगितल्या. अभिनेत्री म्हणाली, “आपल्या फिल्म इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत, ना मला असं वाटतं की असं काही घडत असेल. कुठं तर मुलींकडून त्या पुरुषांना इशारे दिले जात असतात. जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा तुम्ही ते कसं मागता हे देखील महत्त्वाचं असतं”.
पुढे तिने म्हटलं, “जसं मला तुमच्याकडे काम मागायचं आहे तर मी कोणत्या पद्धतीनं ते मागते, त्यावर सगळं असतं”. ‘सर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, काही असेल तर सांगा’, ही काय पद्धत असते, याचा अर्थ काय?”, असा सवाल कुनिकाने केला.
कुनिकानं केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिने भाष्य केलेला हा व्हिडीओ पाहून कुमार सानूच्या लेकाने म्हणजेच जान कुमार सानूनं कुनिकाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तिच्यावर आरोप केले आहेत. “त्यांनी आयुष्यभर हेच केलं, विवाहित पुरुषांसोबत… मला जास्त बोलायचं नाही आहे, बोललो तर खूप काही समोर येईल”, अशा कठोर शब्दात त्यानं कुनिकावर टीका केली आहे.





