शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Top 10 Series : ओटीटीवर ‘स्क्विड गेम २’चा बोलबाला, तर टॉप १०च्या वेबसीरिजला प्रेक्षकांची भरभरुन पसंती, पाहा संपूर्ण यादी

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 14, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
top 10 webseries

या आहेत टॉप १० वेबसीरिज

सध्या ओटीटीची खूप चलती आहे. ओटीटी नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ओटीटी व्ह्यूअरशिपच्या लिस्टबद्दल जाणून घेऊया. म्हणजेच ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये भारतात बघितल्या गेलेल्या कोणत्या ओरिजनल वेबसीरिज आहेत? ते जाणून घ्या. तसेच या लिस्टमध्ये कोणती वेबसीरिज अधिक चालली आणि कोणती वेबसीरिज सर्वात पिछाडीवर आहे? त्याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. दरम्यान समोर आलेल्या लिस्टमध्ये नेटफ्लिक्सच्या तीन वेबसीरिजचा समावेश आहे.  यामध्ये एका डॉक्युमेंट्रीचादेखील समावेश आहे. (top 10 webseries)

दक्षिण कोरियन वेबसीरिज ‘स्क्विड गेम’चा दूसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यामध्ये यामध्ये सगळे जण खेळ खेळत असून यामध्ये खूनखराबा दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या भागामध्ये खूप सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे आता लोक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजला आजवर ४.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची प्रकृती खालावली, रुग्णालयात बसून मेकअप करतानाचा फोटो, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सध्या क्राइम-ड्रामा व थ्रीलर शो ‘ब्लॅक वॉरंट’ ही सीरिज नुकतीच भेटीला आला आहे. या सीरिजमध्ये जहान गुप्ता, राहुल भट्ट, परमवीर सिंह चिमा व अनुराग ठाकूरदेखील आहेत. ही सीरिज १० जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीस आली होती. ही सीरिज आजवर २.३ मिलियन लोकांनी बघितली आहे.

आणखी वाचा – Video : लेकींवर समीर वानखेडेंचं जीवापाड प्रेम, क्रांती रेडकरेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पापा की परी…”

सध्या ओटीटीवर ‘शार्क टॅंक इंडिया’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये ज्यांना स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे तसेच स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये अनेक उद्योजक कल्पना घेऊन येतात. हा शो प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. दूसरा सीजन लोकांच्या खूप पसंतीस पडला आहे. हा शो ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीस येतो. आजवर हा शो ३.३ मिलियन लोकांनी पाहिला आहे.    

‘गुनाह : २’ ही सीरिजदेखील खूप चर्चेत राहिली आहे. यामध्ये अभिमन्युची गोष्ट बघायला मिळत आहे. यामध्ये क्राइम व थ्रीलर बघायला मिळत आहे. या सीरिजचा पहिला भाग खूप पसंत केला गेला आहे. ‘बीस्ट गेम्स’ हा एक रिअलिटी कॉम्पिटिशन शो आहे. यामध्ये प्रसिद्ध युट्यूबर जीमी म्हणजेच ‘मिस्टर बीस्ट’ दिसून येत आहे. त्याच्याबरोबर त्याचे काही पार्टनरदेखील आहेत. एक हजार लोक ५ मिलियन डॉलरचे बक्षीस जिंकण्यासाठी खेळ खेळतात. ‘स्क्विड गेम’ पासून या गेमची प्रेरणा घेतली असल्याचे समोर आले आहे.

Tags: black warrentottsqid game
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Neetu Kapoor Rishi Kapoor Wedding Incident

दारू पिऊनच स्वतःच्या लग्नासाठी मंडपात उभे राहिले होते ऋषी व नीतू कपूर, गिफ्टमध्ये दगड मिळालेले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.